ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज, अभिनेत्री छवी मित्तलने रुग्णालयातच साजरा केला लग्नाचा वाढदिवस!

ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज, अभिनेत्री छवी मित्तलने रुग्णालयातच साजरा केला लग्नाचा वाढदिवस!


Chhavi Mittal Wedding Anniversary : टीव्ही अभिनेत्री छवी मित्तलवर (Chhavi Mittal) 25 एप्रिल रोजी ब्रेस्ट कॅन्सरची अर्थात स्तनाच्या कर्करोगाची शस्त्रक्रिया पार पडली. यानंतर तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित आपल्या वेदना चाहत्यांसोबत शेअर केल्या. त्याचवेळी तिने चाहत्यांना त्यांच्या शुभेच्छा आणि प्रेमासाठी ‘थँक यू’ म्हटले. अभिनेत्री सोशल मीडिया अकाउंटवर आपल्या तब्येतीचे अपडेट्स देत असते. नुकताच तिने तिच्या पतीला किस करतानाचा एक फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे. यासोबतच एक छानसं कॅप्शनही लिहिले आहे.

काल अर्थात 29 एप्रिलला छवी मित्तल आणि मोहित हुसैन (Mohit Hussein) यांच्या लग्नाचा वाढदिवस झाला. लग्नाच्या 17 व्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. मोहितसोबतचे दोन फोटो पोस्ट करत ती म्हणाली, ‘जेव्हा तू माझ्या वडिलांकडे लग्नासाठी माझा हात मागितला, तेव्हाच त्यांनी तुला इशारा दिला होता की, मी खूप आजारी पडते. त्यांचा बोलण्याचा अर्थ साधा ताप होता. पण, मला कर्करोगासारख्या भयानक आजाराचा सामना करावा लागेल, असा विचार कधी तू केला होतास का? मला माहित नाही की, तुला आता या गोष्टीचा पश्चात्ताप होतो आहे की, नाही.. पण मी तुला 100 वेळा माझा जीवनसाथी म्हणून निवडेन. कारण, तू माझ्यासोबत जसे जगतोस तसे इतर कोणीही करू शकत नाही.’

पाहा पोस्ट :

अभिनेत्रीने पुढे लिहिले की, ‘17 वर्षे एकत्र राहिल्यानंतर आज हॉस्पिटलमध्ये आमचे नाते पुन्हा एकदा घट्ट झाले आहे. आता तुला माझी शक्ती आणि कमजोरी दोन्हीही माहित आहे. या परिस्थितीवर आपण मिळून मात करू. मी तुझ्यावर खूप प्रेम करते. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.’

कॅन्सरशी झुंज यशस्वी!

अभिनेत्री छवी मित्तलची शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून, ती आता यातून बरी होत आहे. आत ती कर्करोगमुक्त झाली आहे. या दरम्यान तिला इतक्या वेदना होत आहेत की, कोणतेही पेन किलर औषध यावर काम करत नाहीय. असे असले तरी तिच्या चेहऱ्यावरचे हास्य कायम आहे, त्यामुळे तिला चाहत्यांकडूनही भरपूर प्रेम मिळत आहे.

हेही वाचा :Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

en_USEnglish