श्रद्धा पुनर्वसन केंद्राला (कर्जत) आर्थिक, धान्य व अन्य प्रकारची मोठी मदत

श्रद्धा पुनर्वसन केंद्राला (कर्जत) आर्थिक, धान्य व अन्य प्रकारची मोठी मदत

॥ के. एम.सी महाविद्यालयाचे विद्यार्थी जोपासतात सामाजिक बांधिलकी.॥ श्रद्धा पुनर्वसन केंद्राला (कर्जत) आर्थिक, धान्य व अन्य प्रकारची मोठी मदत

खोपोली (प्रतिनिधी) –
खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित के.एम.सी. महाविद्यालयाचे प्रथम व द्वितीय वर्ष शास्त्र फाऊंडेशन कोर्स विषयाच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमात गिरवलेले धडे सामाजिक बांधिलकीचा रूपाने प्रत्यक्ष अमलात आणले आहेत. विद्यार्थ्यांनी स्वेच्छेने आर्थिक स्वरूपाची तसेच धान्य आणि अन्य आवश्यक अशा गरजू वस्तूंची मोठी मदत श्रद्धा पुनर्वसन केंद्र, कर्जत यांना केली आहे. महाविद्यालयाचे नवनियुक्त प्राचार्य डाॅ. प्रताप पाटील यांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांनी स्वेच्छेने जमा केलेली आर्थिक मदत धान्य व भेटवस्तू आज केंद्राचे समन्वयक श्री.ध्रुव ……. कु. लक्ष्मी, श्री प्रशांत यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या.


२००८ सालापासून फाउंडेशन कोर्स विषयाचे प्रा.मुकेश रूपवते यांच्या विशेष प्रयत्नाने विद्यार्थ्यांच्या माध्यमातून अशा प्रकारची मदत श्रद्धा पुनर्वसन केंद्राला गेली १४ वर्षापासून सातत्याने केली जात आहे. विशेषतः कोरोनाच्या काळातही ही मदत महाविद्यालयाने केंद्रास केलेली आहे. श्रद्धा पुनर्वसन केंद्र ही संस्था मनोरुग्णांच्या पुनर्वसनासाठी खूप मोठे सामाजिक कार्य करीत आहे. “महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये पदवी शिक्षण घेतानाच सामाजिक जाण, समाजाप्रती आत्मीयता व विश्वबंधुत्वाची जाणीव रुजावी या हेतूने हा उपक्रम राबवत असल्याचे मुकेश रुपवते यांनी या विशेष कार्यक्रमात सांगितले. केंद्राचे समन्वयक श्री ध्रुव …. यांनी श्रद्धा पुनर्वसन केंद्राच्या सर्व उपक्रमांबद्दल सविस्तर माहिती यावेळी दिली.

प्राचार्य डॉ. प्रताप पाटील सर यांनी विद्यार्थ्यांनी यातून प्रेरणा घ्यावी व स्व-विकासाबरोबरच समाज विकासामध्ये आपली भूमिका योग्य पद्धतीने बजावली पाहिजे, असे आवाहन केले. या संपूर्ण उपक्रमाबद्दल त्यांनी सहभागी प्राध्यापक व विद्यार्थी विद्यार्थिनींचे अभिनंदन व कौतुक केले. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख डाॅ. अशोक कंधारे, इंग्रजी विभागाचे प्रमुख प्रा.जी. पी. मुळीक, मराठी विभागाचे डाॅ.भाऊसाहेब नन्नवरे, एनसीसीच्या ए.एन.ओ.प्रा.शितल गायकवाड व समन्वयक विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाविद्यालय राबवत असलेल्या उपक्रमाबद्दल संस्थेचे अध्यक्ष संतोष जंगम, उपाध्यक्ष संजय पाटील, कार्यवाह किशोर पाटील, महाविद्यालयाचे उपाध्यक्ष राजेश अभाणी यांनी आनंद व्यक्त करीत सहभागी प्राध्यापक आणि विद्यार्थी- विद्यार्थीनीचे कौतुक व अभिनंदन केले आहे.

============================

Leave a Reply

Your email address will not be published.

en_USEnglish