करारा जवाब मिलेगा; मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वी संजय राऊतांचा विरोधकांना थेट इशारा

करारा जवाब मिलेगा; मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वी संजय राऊतांचा विरोधकांना थेट इशारा


मुंबईः ‘काही जणं महाराष्ट्रातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर, काही जणं सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. या सगळ्याला आज उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray rally) जाहीर सभेतून करारा जवाब देतील. ऐतिहासिक आणि क्रांतीकारक अशी ही आजची रॅली होईल,’ असा थेट इशारा शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिला आहे.

आज बीकेसी येथील मैदानात शिवसेनेची जाहीर सभा होत आहे. या सभेत मुख्यमंत्री व शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे विरोधकांना काय उत्तर देणार याकडं लक्ष लागून राहिले आहे. संजय राऊत यांनीही आज प्रसारमाध्यमांशी बोलताना ही सभा वादळी ठरणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहे.

‘आजच्या सभेचं व्यासपीठ पाहाल तर इतकं मोठं व्यासपीठ मुंबईत निर्माण झालं नव्हतं. भव्य असं व्यासपीठ आहे. शिवसेनेचा कारभार भव्यचं असतो. मैदानात उतरण्याच्या निश्चयाने, जिद्दीने उतरण्यासाठी सभेचं आयोजन केलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या भाषणाची शिवसैनिक वाट पाहत होती. गेल्या दोन वर्षात उद्धव ठाकरेंनी ऑनलाइन संवाद सांधला, बैठका घेतल्या पण विराट सभा प्रदीर्घ कालावधीनंतर होत आहे. शिवसेना आणि गर्दी यांचं नातं आहे. समीकरण आहे. आम्हाला गर्दी जमवावी लागत नाही, गर्दी आणावी लागत नाही. बाळासाहेबांचा विचार, राज्याचा आणि विकासाचा विचार आहे. या विचाराचं लोहचुंबक आहे,’ असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

वाचाः मुख्यमंत्र्यांची आजची सभा वादळी ठरणार?; संजय राऊतांनी दिले स्पष्ट संकेत
‘उद्धव ठाकरेंच्या भाषणाची उत्सुकता महाराष्ट्राला आणि देशाला आहे. या सभेतून प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेल. अडीच वर्षानंतर सभा होत आहे. संपूर्ण देश त्यांचे विचार ऐकू इच्छितो. ऐतिहासिक आणि क्रांतिकारक रॅली होईल. काही लोक राज्याची अशांतता बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे. राज्याला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना उद्धव ठाकरे करारा जवाब देणार आहेत,’ असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

‘महाराष्ट्रातील, देशातील वातावरण आणि वातावरणावर आलेलं मळभ, धुकं, गढूळपणा हे उद्धव ठाकरेंच्या भाषणाने दूर होईल. महाराष्ट्रातील आकाश निरभ्र होईल. या आकाशात भगव्या रंगाचाच धनुष्य दिसेल. अर्थात हे राज्य आणि पक्ष पूर्णपणे शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालत आहे. शिवसेना प्रमुखांची प्रेरणा आहे. काही लोकं राज्य बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. काही अडथळे निर्माण करत आहेत. ही पोटदुखी, जळजळ आहे त्यावर आजच्या सभेत योग्य उपचार केले जातील. कोणाचा बुस्टर डोस माहिती नाही पण मास्टर ब्लास्टर डोस आमचाच असेल. आमची फटकेबाजी असते. प्युअर मास्टर ब्लास्टर डोस असतो,’ अशा शब्दांत संजय राऊतांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

वाचाः शिवसेनेच्या आजच्या सभेत ‘या’ कारणामुळं रामदास कदम अनुपस्थित राहणार?

केतकी चेतळीवर टीका

‘काही लोकं हिमालया ऐवढे असतात, काही व्यक्ती सूर्याच्या तेजाइतक्या तळपत असतात. सूर्यावरती थुंकल आणि हिमालयाकडे तोंड वेडावून दाखवलं तर त्यांचं महत्त्व कमी होत नाही. हे नशेबाज लोकं आहेत. त्यांना कोणीतरी नशा चढवली आहे. दुर्लक्ष केलं पाहिजे. महाराष्ट्रात देशात असे क्षुद्र किटक वावरत असतात. खिडकी उघडली की ते हवा आली की हवेबरोबर वाहून जातील,’ अशा शब्दांत संजय राऊतांनी केतकी चितळेचं नाव न घेता टीका केली आहे.

वाचाः सोनिया गांधींचे धक्कातंत्र?; पक्षाच्या शिबिरात कठोर निर्णय घेण्याचे संकेतSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

en_USEnglish
%d bloggers like this: