पंजाबच्या विजयाने प्लेऑफचे गणित बदलले; RCBसह चार संघांचे टेन्शन वाढले

पंजाबच्या विजयाने प्लेऑफचे गणित बदलले; RCBसह चार संघांचे टेन्शन वाढले
पंजाबच्या विजयाने प्लेऑफचे गणित बदलले; RCBसह चार संघांचे टेन्शन वाढले


मुंबई: आयपीएल २०२२मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा पंजाब किंग्जकडून ५४ धावांनी पराभव स्विकारावा लागला. या पराभवानंतर देखील बेंगळुरूचा संघ गुणतक्त्यात चौथ्या स्थानावर आहे, पण त्यांच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याचा मार्ग अवघड झालाय. पंजाबच्या विजयाने प्लेऑफचे समीकरण आणखी क्लिष्ट झालय. आरसीबीविरुद्ध पंजाबचा पराभव झाला असता तर त्याचे आव्हान संपुष्टात आले असते. आतापर्यंत फक्त गुजरात टायटन्स बाद फेरीत पोहोचली असून चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स स्पर्धेबाहेर झाली आहे.

राजस्थान-लखनौकडे संधी

लखनौ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्याकडे प्लेऑफमध्ये पोहोचण्याची सहज संधी आहे. या दोन्ही संघांमध्ये अद्याप एक लढत व्हायची आहे. १५ मे रोजी होणाऱ्या या लढतीत लखनौचा विजय झाला तर ते प्लेऑफमध्ये पोहोचतील. राजस्थानला टॉप दोन मध्ये राहण्यासाठी शिल्लक दोन लढती जिंकाव्या लागतील. जर त्यांचा लखनौ आणि चेन्नईकडून पराभव झाला तर प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना रनरेटवर अवलंबून रहावे लागले. राजस्थानचे नेट रनरेट प्लस ०.२२८ इतके आहे.

वाचा- प्लेऑफमध्ये पोहोचण्याची स्वप्न पाहणाऱ्या KKRला झटका; पॅट कमिंन्स IPLमधून बाहेर

बेंगळुरूकडे फक्त एक मॅच

आरसीबीकडे आता फक्त एकच मॅच शिल्लक आहे. १३ सामन्यात त्यांचे १४ गुण झाले आहे. बेंगळुरूची अखेरची लढत अव्वल स्थानी असलेल्या गुजरातविरुद्ध होणार आहे. जर या सामन्यात त्यांचा पराभव झाला तर संघाचे टेन्शन वाढू शकते. कारण त्यांचे नेटरनरेट वजा ०.३२३ इतके आहे आणि विजय मिळाला तर प्लेऑफमध्ये जाण्याची संधी अधिक असेल.

वाचा- IPLमध्ये डेथ रेसला सुरुवात; मुंबई-चेन्नई बाहेर आता कोणाचा नंबर, वाचा अपडेट

दिल्ली, हैदराबाद, पंजाबसाठी संधी

पंजाबच्या विजयाने दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांचे टेन्शन वाढवले आहे. दिल्ली, पंजाब आणि हैदराबाद या पैकी दोन संघांचे १६ गुण होऊ शकतात. पंजाबला दोन सामने खेळायचे आहेत. या लढती दिल्ली आणि हैदराबादविरुद्ध होणार आहेत. जर दोन्हीत त्यांचा विजय झाला तर दिल्ली आणि हैदराबादच्या अडचणी वाढतील. हैदराबादकडे अजून ३ लढती आहेत. पंजाब, केकेआर आणि मुंबईविरुद्ध त्यांना खेळायचे आहे. मुंबईचा संघ स्पर्धेबाहेर झाला असला तरी तो लयीमध्ये आलाय. हैदराबादने पुढील तिनही सामन्यात विजय मिळवला तर ते प्लेऑफसाठी दावेदारी दाखल करू शकतात.

वाचा- चेन्नईविरुद्ध रोहित शर्मा घाबरला होता; सामन्यानंतर सांगितले कारण…

केकेआर IPL बाहेर

कोलकात नाईट रायडर्सला अद्याप दोन सामने खेळायचे आहेत. या दोन्हीत विजय मिळवला तर त्यांचे १४ गुण होतील. संघाचे नेट रनरेट देखील वजा आहे. ४ संघाचे आधीपासून १४ गुण आहेत. दिल्ली, पंजाब पैकी एक संघ १४ गुणांपर्यंत पोहोचू शकतो. त्याचे रनरेट देखील प्लस आहे. अशात केकेआरचे स्पर्धेतील आव्हान जवळ जळव संपुष्टात आले आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

en_USEnglish
%d bloggers like this: