Salman Khan Look : मोठे केस, रागीट अंदाज; सलमान खानच्या नव्या चित्रपटातील लूकची चर्चा

Salman Khan Look : मोठे केस, रागीट अंदाज;  सलमान खानच्या नव्या चित्रपटातील लूकची चर्चा
Salman Khan Look : मोठे केस, रागीट अंदाज;  सलमान खानच्या नव्या चित्रपटातील लूकची चर्चा


Salman Khan New Look From His Upcoming Film : बॉलिवूडचा ‘दबंग’ सलमान खानचा दरवर्षी ईदच्या मुहूर्तावर नवीन चित्रपट प्रदर्शित होतो. मात्र यावर्षी ‘भाईजान’चा नवा चित्रपट न आल्याने त्याचे चाहते काहीसे नाराज झाले होते. मात्र सलमान खानच्या चाहत्यांसाठी आता एक चांगली बातमी आहे. सलमान खानने त्याच्या आगामी नव्या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. सलमानने इंस्टाग्रामवर त्याच्या नव्या लूकचा फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. 

सलमान खानने शेअर केलेल्या फोटोमध्ये सलमान खानचा नवा अंदाज पाहायला मिळत आहे. सलमानने इंस्टाग्रामवर चित्रीकरणा दरम्यानचा एक फोटो शेअर केला आहे. सलमानचा हा नवा लूक सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. नव्या फोटोंमध्ये मोकळे केस, ब्लॅक टी-शर्ट, ब्लॅक जॅकेट, गॉगल चेहऱ्यावर राग आणि हातात लोखंडी रॉड असा सलमानचा डॅशिंग अंदाज पाहायला मिळत आहे.

नव्या लूकवरून आगामी चित्रपटात सलमान खान जबरदस्त अॅक्शन करताना पाहायाला मिळणार असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, सलमानच्या आगामी चित्रपटाचं नाव अद्याप गुलदस्त्यात आहे. चित्रपटाच्या नावाबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही, मात्र हा चित्रपट बिग बजेट असल्याचं बोललं जात आहे.


सलमानचा नवा लूक पाहिल्यानंतर सलमान खानचे चाहते चित्रपटाच्या नावाची आणि स्टारकास्टची आतुरतेने वाट पाहत आहेत. सलमान 2021 मध्ये ‘अंतिम’ चित्रपटात प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला. मात्र हा चित्रपट प्रेक्षकांच्या फारसा पसंतीस उतरला नाही. आता सलमानचे चाहते त्याच्या दमदार भूमिकेसह नव्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

‘कभी ईद, कभी दिवाळी’ चित्रपटाव्यतिरिक्त सलमान खान ‘टायगर 3’ चित्रपटामध्येही दिसणार आहे. त्याचबरोबर शाहरुख खानच्या ‘पठाण’ आणि तेलगू चित्रपट ‘गॉड फादर’मध्येही सलमान खान कॅमिओ भूमिकेत झळकणार आहे. ‘गॉड फादर’ हा सलमान खानचा तेलुगू डेब्यू चित्रपट आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या

 Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

en_USEnglish
%d bloggers like this: