‘केतकीचे मानसिक संतुलन बिघडले; ५-६ फटके दिल्यांनतर अक्कल येईल’

वाचा- कोण आहे नवनीत राणा? एका…; विद्या चव्हाण यांचे वादग्रस्त वक्तव्य
तिचे आई-वडील संस्कार द्यायला कमी पडले म्हणून ही वेळ आली आहे. आता तिला छडी लागली की अक्कल येईल. तिचे वय काय आणि पवारांचे वय काय? समाजाबद्दलचे योगदान काय? असा सवाल रुपाली पाटील यांनी विचारला.
वाचा- शरद पवारांवरील ‘ती’ पोस्ट भोवणार; केतकी चितळेविरोधात ठाण्यात गुन्हा दाखल
चोप देणे हाच एक पर्याय
माझी तरी अशी इच्छा आहे की, काळ्या शाईने तिचे तोंड रंगवावे आणि ५-६ फटके द्यावेत ज्यामुळे तिला अक्कल येईल, असे रुपाली पाटील म्हणाल्या. केतकीने जर तिच्या पहिल्या पिढीला विचारले तर ते लोक देखील सांगतील की, त्यांनी शरद पवारांच्या सोबत काम केले आहे. केतकी ब्राम्हण समाजातील आहे म्हणून संपूर्ण समाज तसा असे कधीच होत नाही. पण या समाजात असे काही लोक आहेत ज्यांना चोप देणे हाच एक पर्याय आहे.