राज ठाकरे म्हणजे केमिकल लोचाची केस; नाव न घेता उद्धव ठाकरेंची टीका


Uddhav Thackeray On Raj Thackeray: शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईतील बीकेसीत भव्य सभा घेत आपल्या विरोधकांचा समाचार घेतला आहे. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांना हात घालत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही हल्ला चढवला आहे. अभिनेता संजय दत्त याच्या मुन्नाभाई चित्रपटाचा उल्लेख करत ते म्हणाले आहेत की, ”मुन्नाभाई चित्रपटात त्याला गांधीजी दिसतात, तसं एकाला बाळासाहेब दिसतात. भगवी शाल घालुन फिरतो. म्हंटल, अरे तो मुन्नाभाई लोकांच भल तरी करतो. त्यात शेवटी कळत की केमिकल लोचा झाला आहे, हे तसंच आहे.” त्यांनी नाव न घेता राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.