जवाब मिलेगा और ठोक के मिलेगा; उद्धव ठाकरेंच्या भाषणावर फडणवीसांचा पलटवार

देवेंद्र फडणवीसांनी ट्विटमध्ये काय म्हटलंय?
सर्वत्र पळापळ अन् गदारोळ,नागरिक भयभीत अन् विरोधक दहशतीत, सर्वत्र सन्नाटा अन् लोक घामाघूम…
अरे छट हा तर निघाला…आणखी एक ‘ #टोमणे बॉम्ब’…
जवाब मिलेगा और ठोक के मिलेगा !!!
उद्धव ठाकरे यांची फडणवीसांवर खोचक टीका
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजच्या सभेत बाबरी मशिदीसंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी केलेला दावा खोडून काढला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना शाब्दिक चिमटाही काढला. बाबरी पडली तेव्हा अयोध्येत शिवसैनिक नव्हते, मी तेथे गेलो होतो, असे फडणवीस म्हणतात. अरे त्यावेळी तुमचं वय काय होतं? तेव्हा अयोध्येला शाळेची किंवा कॉलेजची सहल गेली होती का? तुमचं वय काय होतं, तुम्ही बोलताय काय? तुम्ही आमच्यावर शंका घेता मग मी देखील देवेंद्र फडणवीसांना एक सवाल विचारतो, तुम्ही देशासाठी सोडा हिंदुत्वासाठी काय केलं, हे सांगा. भाजपने बाबरी पाडलीच नाही. पण देवेंद्र फडणवीस, तुम्ही त्याठिकाणी असतात आणि बाबरी मशिदीवर नुसता चढायचा प्रयत्न केला असतात तर तुमच्या वजनानेच बाबरी मशीद खाली आली असती. कारसेवकांना श्रमच करावे लागले नसते. तुम्ही एक पाय जरी टाकला असता तर बाबरी मशीद खाली आली असती, अशी खोचक टिप्पणी उद्धव ठाकरे यांनी केली होती.
तुमच्या वजनानेच बाबरी खाली आली असती; वय किती, बोलता किती’