एक-दोन नव्हे, तब्बल सहा ‘फिल्मफेअर’ मिळवणारी बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’!

एक-दोन नव्हे, तब्बल सहा ‘फिल्मफेअर’ मिळवणारी बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’!
एक-दोन नव्हे, तब्बल सहा ‘फिल्मफेअर’ मिळवणारी बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’!


Madhuri Dixit Birthday : बॉलिवूडमध्ये बरेच दिग्गज कलाकार आहेत, जे प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करतात. परंतु, त्यापैकी काही मोजकेच लोक असे आहेत, ज्यांना ‘सदाबहार’ म्हटले जाते. राजेश खन्ना, देव आनंद, अमिताभ बच्चन, श्रीदेवी, राज कपूर, रेखा, माधुरी दीक्षित यांच्यासह असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी गेली अनेक दशके बॉलिवूडवर राज्य केले आहे. यांपैकी अनेक कलाकार आजही प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहेत. यापैकीच एक नाव म्हणजे अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit). आज, बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित तिचा 54वा वाढदिवस साजरा करत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित आपल्या अभिनयाने आजही प्रेक्षकांना स्तब्ध करत आहे. माधुरी 90च्या दशकातील बॉलिवूडची सर्वात मोठी सुपरस्टार होती. 1984 मध्ये राजश्री प्रॉडक्शन निर्मित ‘अबोध’ या चित्रपटातून माधुरीने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. पहिल्या चित्रपटाच्या वेळी माधुरी केवळ 17 वर्षांची होती. माधुरीचा हा चित्रपट फारशी जादू दाखवू शकला नाही. यानंतरही माधुरीचे अनेक चित्रपट तसे डब्यातच गेले होते. करिअरच्या सुरुवातीच्या काळात अनेक फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर माधुरीला 1988 मध्ये आलेल्या ‘तेजाब’ चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटाने माधुरीच्या बुडत्या करिअरची दिशाच बदलून टाकली. माधुरी दीक्षितचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला, ज्यामुळे ती रातोरात स्टार बनली.

अभिनेत्यापेक्षा जास्त मानधन मिळवणारी अभिनेत्री!

‘तेजाब’चित्रपटामधील ‘एक दो तीन’ या सुपरहिट गाण्याने माधुरीने प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घातली. या चित्रपटापासून तिच्या ‘धकधक गर्ल’ होण्याच्या प्रवासाला सुरुवात झाली. ‘हम आपके है कौन’ची निशा असो किंवा ‘साजन’ची पूजा असो, तिने प्रत्येक व्यक्तिरेखा अतिशय उत्तमपणे साकारली आहे. 1994 मध्ये सलमान खानसोबतच्या ‘हम आपके है कौन’ या चित्रपटासाठी तिचे मानधनही सलमान खानपेक्षा जास्त होते, जे त्या काळात कोणत्याही अभिनेत्रीसाठी मोठी गोष्ट होती.

अशी झाली ‘धकधक गर्ल’!

आपल्या प्रदीर्घ आणि हिट चित्रपट कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट देणाऱ्या माधुरीने 80च्या दशकात टॉपवर असलेल्या बॉलिवूडची ‘चांदनी’ म्हणजेच अभिनेत्री श्रीदेवीलाही मागे टाकले. माधुरी दीक्षित केवळ तिच्या दमदार अभिनयासाठीच नाही, तर तिच्या उत्कृष्ट नृत्यासाठीही ओळखली जाते. यानंतर माधुरीच्या ‘बेटा’ चित्रपटातील ‘धकधक करने लगा’ या गाण्याने प्रेक्षकांना अक्षरशः वेद लावले. आपल्या नृत्याने लोकांचे मन जिंकणाऱ्या माधुरीला लोक ‘धकधक गर्ल’ या नावाने हाक मारू लागले. तिच्या कोरिओग्राफर दिवंगत सरोज खान यांनीही माधुरीच्या चित्रपटांच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांनीच तिला बॉलिवूडच्या बॉक्स ऑफिस अभिनेत्रीसह नृत्याची राणी बनवले आहे.

माधुरी दीक्षितने तिच्या आयुष्यात अनेकदा यशाची शिखरे पाहिली आहेत. या प्रवासामध्ये तिला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. इतकेच नाही तर, एक-दोन नव्हे, तब्बल 6 वेळा ‘फिल्मफेअर पुरस्कारां’वर माधुरीने आपले नाव कोरले आहे. तर, 14 वेळा तिने या पुरस्कारांत नामांकन मिळवले आहे.

हेही वाचा :Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

en_USEnglish
%d bloggers like this: