LSG vs RR :  राहुल आणि संजूमध्ये रॉयल सामना, कधी कुठे पाहाल सामना?

LSG vs RR :  राहुल आणि संजूमध्ये रॉयल सामना, कधी कुठे पाहाल सामना?
LSG vs RR :  राहुल आणि संजूमध्ये रॉयल सामना, कधी कुठे पाहाल सामना?
IPL 2022, LSG vs RR :  आयपीएलच्या मैदानात रविवारी दोन सामन्याचा धमाका आहे. दुपारी चेन्नई आणि गुजरात यांच्यात सामना होणार आहे. तर सायंकाळी राहुलचा लखनौ सुपर जायंट्स आणि संजूचा राजस्थान रॉयल्स यांच्यात लढत होणार आहे. आयपीएलचा पहिलाच हंगाम खेळणाऱ्या लखनौने दमदार कामगिरी केली आहे. लखनौने 12 सामन्यात आठ विजय मिळवले आहेत. राजस्थानचा संघानेही प्रभावी कामगिरी केली आहे. राजस्थान संघाने 12 सामन्यात सात विजय मिळवलेत. दोन्ही संघाला प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी विजय गरजेचा आहे. लखनौचा संघ दुसऱ्या तर लखनौचा संघ तिसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी दोन्ही संघाला विजय गरजेचा आहे.

लखनौसाठी कर्णधार केएल राहुल आणि क्विंटन डिकॉक यांनी धाडक फलंदाजी केली आहे. त्याशिवाय दीपक हुड्डा आणि युवा आयुष बडोनी यांनी ताबडतोड फलंदाजी केली आहे. दुसरीकडे राजस्थानसाठी  जोस बटलरने धावांचा पाऊस पाडलाय. तीन शतकासह यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा बटलरच्या नावावर आहेत. तर गोलंदाजीत अश्विन आणि चहल कमाल करत आहे. त्याशिवाय प्रसिद्ध कृष्णा आणि बोल्टही भेदक मारा करत आहे. लखनौसाठी आवेश खान आणि मोहसीन खान यांनी भेदक मारा केलाय. जेसन होल्डर आणि मार्कस स्टॉयनिस यांचा फॉर्म लखनौसाठी चिंतेचा विषय आहे.

कधी आहे सामना?
आज 15 मे रोजी होणारा लखनौ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी सात वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. सात वाजता नाणेफेक होईल. नाणेफेकीचा कौल महत्वाचा ठरणार आहे.

कुठे आहे सामना?
हा सामना मुंबईतील ब्रेबॉन स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

कुठे पाहता येणार सामना?
लखनौ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील आजचा सामना स्टार स्पोर्ट नेटवर्कवर पाहता येणार आहे. वेगवेगळ्या भाषेतून सामना पाहता येणार आहे. तसेच हॉटस्टार अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला आयपीएलचे लाईव्ह कव्हरेज आणि बातम्या  पाहाता येईल.
Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

en_USEnglish
%d bloggers like this: