सजंय राऊत भगव्या उपरण्यानं घाम पुसतात हे याचं हिंदुत्त्व, मनसे नेत्याचं टीकास्त्र

सजंय राऊत भगव्या उपरण्यानं घाम पुसतात हे याचं हिंदुत्त्व, मनसे नेत्याचं टीकास्त्र


मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अखिल चित्रे यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांवर टीका केली आहे. शिवसेनेच्या सभेनंतर मनसेकडून टीका करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील नेते सकाळी उठत असले तरी त्यांनी सकाळी उठून काय दिवे लावले, असा सवाल चित्रे यांनी केला आहे. सध्या काय उद्योग राहिलेला नाही, त्यांना महाराष्ट्रातील नेते सकाळी उठतात की दुपारी उठतात हे पाहायला जातात का? सकाळी उठून काय उद्योग खात्यात काय दिवे लावले, असं अखिल चित्रे म्हणाले. अखिल चित्रे यांनी शिवसेना नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यावर टीका केली. तर, संजय राऊत यांच्यावरही टीका केली आहे.

सजंय राऊत भगव्या उपरण्यानं घाम पुसतात हे याचं हिंदुत्त्व आहे. महाविकास आघाडीतील नेते शॉर्ट सर्किट आहेत. त्यांच्यामध्ये पक्षांतर्गत लोचा आहे, अशी टीका अखिल चित्रे यांनी केली आहे. सामनावीर, शिवसेनेचे लाऊडस्पीकर रोज सकाळी बांग देतात. पक्षप्रमुख भाषण करत असताना हे महाशय पाठीमागं बसून भगव्या उपरण्यानं हे घाम पुसतात हे याचं हिंदुत्त्व आहे का? असा सवाल अखिल चित्रे यांनी केला आहे.

मनसेचे नवी मुंबईतील नेते गजानन काळे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. मुख्यमत्र्यांची सभा ही मास्टर सभा नव्हती तर ती पाठातंर सभा होती, असं काळे म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्या भाषणात जोश नव्हता, अशी टीका देखील गजानन काळे यांनी केली आहे.

भाजप आज शिवसेनेला उत्तर देणार?
भाजपकडून आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यांकडून करण्यात आलेल्या टीकेला प्रत्युत्तर देण्यात येणार आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आज गोरेगावमधील नेस्को सेंटरमध्ये सभा घेणार आहेत. आजच्या सभेत देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे आणि शिवसेनेसह महाविकास आघाडी सरकारवर काय टीका करतात हे पाहावं लागणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी शिवेसेनेची सभा झाल्यानंतर ताल ठोक के जवाब दिया जाएगा, असं म्हटलं होतं त्यामुळं आज भाजप शिवसेनेला कशा प्रकारे प्रत्युत्तर देणार हे पाहावं लागणार आहे. भाजप नेते किरीट सोमय्या देखील सकाळी ९ वाजता माध्यमांशी संवाद साधणार आहेत. किरीट सोमय्या शिवसेनेवर काय हल्लाबोल करणार हे पाहावं लागणार आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

en_USEnglish
%d bloggers like this: