राहुल गांधींची वर्षभरात काश्मीर ते कन्याकुमारी देशव्यापी यात्रा, सूत्रांची माहिती

राहुल गांधींची वर्षभरात काश्मीर ते कन्याकुमारी देशव्यापी यात्रा, सूत्रांची माहिती


उदयपूर :काँग्रेस (Congress) पक्षाचं नव संकल्प शिबीर राजस्थानच्या उदयपूरमध्ये सुरु आहे. या नवसंकल्प शिबिरात काँग्रेस २०२४ च्या निवडणुकींना कसं सामोरं जायचं या संदर्भात रणनीती ठरवणार आहे. याशिवाय काँग्रेस अंतर्गत विविध मुद्यांवर चर्चा सुरु आहे. १३ मे रोजी सुरु झालेलं शिबीर आज संपणार आहे. नवसंकल्प शिबिरामध्ये राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची पुढील वर्षभरात काश्मीर ते कन्याकुमारी अशी देशव्यापी जनजागरण यात्रा आयोजित करण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं यासंदर्भात ट्विट केलं आहे.

Andrew Symonds Death: अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू, चाहत्यांमध्ये शोककळा पसरली
नवसंकल्प शिबिरामध्ये राहुल गांधी यांच्या पुढच्या वर्षभरात देशभरातल्या अनेक ठिकाणी जनजागरण यात्रा आयोजित करण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. राहुल गांधी यांच्या देशव्यापी जनजागरण यात्रेत बहुतांश ठिकाणी पदयात्रांचा समावेश असेल, असं सूत्रांनी सांगितलं आहे.

काँग्रेस पक्ष महागाई,बेरोजगारीच्या मुद्द्यावर देशभरात शंभर ठिकाणी मेळावे आयोजित करणार आसल्याची माहिती आहे. तर, काँग्रेसमधील जी-२३ गटाच्या नेत्यांच्या मागणीनुसार काँग्रेसमध्ये भाजपच्या धर्तीवर पार्लमेंटरी बोर्ड ही तयार होण्याची शक्यता असल्याची माहिती आहे.

काँग्रेस पक्षानं राजस्थानच्या उदयपूरमध्ये आयोजित केलेल्या नवसंकल्प शिबिराचा आज अखेरचा दिवस आहे. काँग्रेसचं अध्यक्षपद पुन्हा एकदा राहुल गांधी यांच्याकडे देण्यात येणार का हे येणाऱ्या दिवसांमध्ये स्पष्ट होणार आहे. दुसरीकडे सोनिया गांधी यांनी नव संकल्प शिबिराच्या पहिल्या दिवशी पक्षासमोरचं संकट असाधारण असल्याचं म्हटलं आहे. आपल्याला विशाल सामुदायिक प्रयत्नांनी त्याचा सामना करायचं असल्याचं सोनिया गांधी म्हणाल्या आहेत.

उदयपूर येथील नवसंकल्प शिबिरात काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक सुरु झाली आहे. या कार्यकारिणीत नेमक्या कोणत्या मुद्यांवर चर्चा झाली हे येणाऱ्या काळात समोर येईल.

रेती तस्करांची धटींग, बनावट शिक्क्याचा वापर केला नंतर दोघांवर गुन्हा दाखल झाला

काँग्रेसनं नव संकल्प शिबिरात विविध विषयांवर समित्यांची निर्मिती करुन चर्चा केली होती. महागाईच्या मुद्यावर, शेतकऱ्यांच्या मुद्यावर चर्चा करण्यात आली. न्याय योजनेवर देखील चर्चा झाल्याची माहिती आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप, महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह इतर नेते उदयपूर नवसंकल्प शिबिरात सहभागी झाले आहेत.

खासदाराच्या मुलाचा लग्न सोहळा; अजित पवार आणि फडणवीसांची एकत्र उपस्थितीSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

en_USEnglish