कोकण रेल्वेची वाहतूक हळूहळू पूर्वपदावर, कोकण कन्या एक्स्प्रेस मार्गस्थ

रत्नागिरी : कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी आताची महत्त्वाची बातमी आहे. कोकण रेल्वेवरील वाहतूक जवळपास अडीच तासांपासून ठप्प आहे. इंजिनात बिघाड झाल्याने विलवडे स्टेशनजवळ कोकण कन्या एक्स्प्रेस उभी आहे.
८.१५ वाजेची अपडेट… कोकण रेल्वेची वाहतूक हळूहळू पूर्वपदावर…
कोकणकन्या रेल्वेच्या इंजीनमध्ये बिघाड झाला होता. वैभववाडी येथून पर्यायी इंजिन मागवण्यात आले होते. त्यामुळे आता हे पर्यायी इंजिन बसवून कोकण कन्या मार्गस्थ झाली आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक आता सुरू झाली आहे. आरवली निवसर दरम्यान कोकण कन्या थांबली होती.
भाट्ये समुद्रकिनारी आढळला विषारी काटेरी केंड मासा; शत्रू जवळ आला की फुटबॉलसारखा बनतो