प्रभाससोबतच्या त्या अफवांवर कियारा स्पष्टच बोलली, म्हणाली…

प्रभाससोबतच्या त्या अफवांवर कियारा स्पष्टच बोलली, म्हणाली…
प्रभाससोबतच्या त्या अफवांवर कियारा स्पष्टच बोलली, म्हणाली…


मुंबई: कलाकार, त्यांचे आगामी सिनेमे आणि मैत्री याबद्दल नेहमीच अफवा पसरत असतात. अनेकदा या अफवांकडे कलाकार दुर्लक्ष करणं पसंत करतात. चर्चेचा अतिरेक झाल्यावर मात्र त्यांना त्याबद्दल काहीतरी बोलावं किंवा सोशल मीडियावर त्यांचं म्हणणं मांडावं लागतं. अभिनेत्री कियारा अडवाणीवरही सध्या अशीच वेळ आली आहे. आपण प्रभाससोबत कुठलाही सिनेमा करत नसून, तशी काही चर्चाही झालेली नाही असं तिला जाहीर करावं लागलं.

दिग्दर्शक संदीप रेड्डा वांगा याच्या ‘स्पिरिट’ या आगामी सिनेमात प्रभास काम करत आहे. या कलाकृतीची नायिका म्हणून कियाराची वर्णी लागल्याची जोरदार चर्चा होती. इतकंच नाही, तर चाहत्यांनी या जोडीचे फोटो पोस्ट करत या चित्रपटाबद्दल तिला प्रश्न विचारायला सुरुवात केली होती. ही चर्चा वाढल्यानं कियारातर्फे एक स्टेटमेंट जाहीर करण्यात आलं आहे.
‘धर्मवीर’साठी प्रसादला नव्हे तर या दिग्दर्शकाला होती पहिली पसंती , प्रविण तरडेंचा खुलासा
‘या चित्रपटासाठी कियाराला विचारणा झालेली नाही आणि अशी कुठलीही चर्चाही झालेली नाही. असं काही असल्यास आम्ही अधिकृतपणे त्याची घोषणा करू. तोपर्यंत कुणीही अशा अफवा पसरवू नयेत, ही विनंती,’ असं या स्टेटमेंटमध्ये म्हणण्यात आलं आहे.

कियारा सध्या आगामी चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. तिच्या हाती असलेले बिग बजेट चित्रपट यंदा लागोपाठ प्रदर्शित होत आहेत. त्यामुळे दाक्षिणात्य इंडस्ट्रीतूनही तिला सातत्यानं विचारणा होत आहे. त्यातूनच ही अफवा पसरली असल्याचं दिसतंय. चित्रपटांसह सिद्धार्थ मल्होत्रा आणि तिचं नातंही चर्चेत आहे. यावर्षाच्या अखेरीस दोघं लग्नगाठ बांधण्याची शक्यता आहे. या दोघांनी मात्र त्यावर काही भाष्य केलेलं नाही. सिद्धार्थनंही आगामी चित्रपटांचं काम सुरू केलं आहे. ‘शेरशाह’ या चित्रपटातली या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना आवडल्यानं आता ही दोघं आगामी काळात कोणत्या कलाकृतीत दिसतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
VIDEO: ‘धर्मवीर’ पाहून प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईनं केलं प्रसादचं कौतुकSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

en_USEnglish
%d bloggers like this: