प्रियांका चोप्राच्या चेहऱ्यावर जखमा पाहून चाहते पडले चिंतेत, अभिनेत्रीला नक्की झालं काय?

प्रियांका चोप्राच्या चेहऱ्यावर जखमा पाहून चाहते पडले चिंतेत, अभिनेत्रीला नक्की झालं काय?
प्रियांका चोप्राच्या चेहऱ्यावर जखमा पाहून चाहते पडले चिंतेत, अभिनेत्रीला नक्की झालं काय?


मुंबई : प्रियांका चोप्रा नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. तिचं वैयक्तिक आयुष्य असो, नाही तर व्यावसायिक. त्याचे फोटो, व्हिडिओ ती शेअर करत असते. फॅन्सही त्यामुळे खूश असतात. पण अलिकडे प्रियांका चोप्रानं आपला एक फोटो शेअर केला. तो पाहून सगळे जण चिंतेत पडले. काय कारण आहे?

प्रियांका चोप्रानं शेअर केलेल्या फोटोत तिच्या चेहऱ्यावर जखमा, रक्ताचे डाग दिसत आहेत. ते पाहून लोक टेंशनमध्ये आले आहेत. पण तुम्ही काळजी नका करू. कारण प्रियांका चोप्रा एकदम खुशाल आहे. या जखमांमागचं सत्य जाणून घेऊ या.

Photo :सुहाना खान करतेय सर्वात कठीण योगासन, फॅन्स म्हणाले शाहरुखचेच आहेत गुण

सिनेमाचं सुरू आहे शूटिंग

प्रियांका चोप्रा सध्या हाॅलिवूड सीरिज सिटाडेलचं (Citadel) शूटिंग करत आहे. आधीही तिनं सेटवरचे फोटो शेअर केले आहेत. पण या फोटोमुळे लोक चिंतेत पडले. प्रियांकाच्या ओठांजवळ रक्त दिसतेय. डोळे लाल आणि डोळ्यात पाणी दिसत आहे. अनेकांना हा फोटो पाहून तिला अपघात झाला की काय असंच वाटतंय.

प्रियांकाची पोस्ट व्हायरल

हा फोटो शेअर करत प्रियांकानं एक कॅप्शन लिहिली आहे. ती लिहिते, ‘काम करताना तुमचाही दिवस कठीण होता का?’ या पोस्टवर इन्स्टाग्रामवर आतापर्यंत १ लाख ९२ हजापरपेक्षा जास्त लोकांनी लाइक केलं आहे. अभिनेत्रीला पाहून तिनं अॅक्शन सीन शूट केलाय, असं वाटतं.

लेकीला घरी आणल्यानंतर कामावर परतली

प्रियांका चोप्रानं या वर्षी मदर्स डेला कन्या मालती मेरीला घरी आणलं. ती १०० दिवस रुग्णालयात होती. प्रियांका आणि निकनं मालतीसोबत खूप फोटोही शेअर केलेत.

विराट कोहलीकडून अनुष्का शर्मा शिकतेय बॅटिंग, रोज पाठवते प्रॅक्टिसचे Video

प्रियांकाचे येणारे सिनेमे

प्रियांका सिटाडेल सीरिजबरोबरच बाॅलिवूड सिनेमातही दिसणार आहे. त्यात फरहान अख्तरच्या जी ले जरा या सिनेमात ती आलिया भट्ट आणि कतरिना कैफसोबत दिसणार आहे. याशिवाय दोन हाॅलिवूड सिनेमेही आहेत. यात It’s All Coming Back To Me आणि Ending Things यावर काम सुरू आहे.

उर्मिलासोबत दुराव्याच्या चर्चेवर अखेर आदिनाथने दिले उत्तरSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

en_USEnglish
%d bloggers like this: