Aai Kuthe Kay Karte : अनिरुद्ध देणार अरुंधतीला सल्ला

Aai Kuthe Kay Karte : अनिरुद्ध देणार अरुंधतीला सल्ला


Aai Kuthe Kay Karte : ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेत लवकरच एक ट्वीस्ट येणार आहे. यामुळे अरुंधतीचे आयुष्य बदलणार आहे. मालिकेच्या आगामी भागात अनिरुद्ध अरुंधतीला एक महत्त्वाचा सल्ला देताना दिसणार आहे. आशुतोषचं जर तुझ्यावर प्रेम असेल, तर तू त्याचा विचार कर, असा सल्ला अनिरुद्ध आशुतोषला देताना दिसणार आहे. 

अनिरुद्ध हा अनेकदा अरुंधतीचे पाय खेचताना दिसला आहे. आता अनिरुद्ध अरुंधतीला एक महत्त्वाचा सल्ला देताना दिसणार आहे. आई कुठे काय करते या मालिकेत नेहमीच ट्वीस्ट येत असता. त्यामुळेच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते. अनिरुद्धचा सल्ला ऐकून अरुंधतीचे आयुष्य बदलणार का? याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. 

अरुंधतीच्या आयुष्यात लवकरच एक मोठी घडामोड होणार आहे. प्रोमोमध्ये अनिरुद्ध म्हणतो आहे,”आशुतोष आता बरा आहे. आमच्यासाठी तू खूप केलं आहे. आता तू तुझा विचार कर”. ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या आगामी भागात अनिरुद्धची एक वेगळी बाजू प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
आशुतोषचा अपघात झाल्याने अरुंधतीला मोठा धक्का बसला होता. आशुतोषचा अपघात झाल्यानंतर अरुंधतीला आशुतोषवरील प्रेमाची जाणीव झाली. तसेच अरुंधतीने नकळत मनातील भावना अनिरुद्धजवळ बोलून दाखवल्या. मालिकेत अनिरुद्धमध्ये चांगला बदल होताना दिसत आहे. 

अनिरुद्धने दिलेल्या सल्ल्याचा अरुंधती विचार करून ती आशुतोषसोबत लग्न करण्याचा निर्णय घेणार का हे लवकरच प्रेक्षकांना ‘आई कुठे काय करते’च्या आगामी भागात पाहायला मिळणार आहे. 

आशुतोषचा झाला होता जबर अपघात

नव्या गाण्याची आनंदाची बातमी घेऊन घरी जात असताना आशुतोषच्या गाडीला मोठा अपघात होतो. आशुतोष आणि नितीन दोघे घरी परतत असताना, त्यांच्या गाडीसमोर अचानक एक वृद्ध व्यक्ती येते. त्या व्यक्तीला वाचवण्याच्या नादात नितीन गाडी पटकन बाजूला वळवण्याचा प्रयत्न करतो. मात्र, त्याचवेळी गाडी जोरात भिंतीवर जाऊन आदळते आणि दोघांचा भीषण अपघात होतो. या अपघातात नितीनला थोडाच मार लागतो. मात्र, आशुतोषला गंभीर दुखापत होते.

संबंधित बातम्या

Aai Kuthe Kay Karte : अनिरुद्धचा पुन्हा जळफळाट होणार! गाण्याच्या निमित्ताने आशुतोष-अरुंधती एकत्र येणार!

Marathi Serial : ‘या’ आठवड्यात कोणती मालिका ठरली प्रेक्षकांच्या आवडती? जाणून घ्या टीआरपी रिपोर्ट

Aai Kuthe Kay Karte : अरुंधतीची नवी झेप, कॉलेजमध्ये जाऊन शिक्षण पूर्ण करण्याचा निर्धार!Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

en_USEnglish