दहावीत शिकणाऱ्या मुलाचे अपहरण; केली तब्बल ४ कोटींची मागणी, पण घडले असे की…

दहावीत शिकणाऱ्या मुलाचे अपहरण; केली तब्बल ४ कोटींची मागणी, पण घडले असे की…


जालना: जालन्यात इयत्ता दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचे अपहरण (Kidnapping) करून अज्ञाताने ४ कोटी रुपयांची खंडणी (Ransom) मागितल्याची घटना समोर आली आहे. स्वयम गादिया असे अपहरण करण्यात आलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. सध्या दहावीची परीक्षा सुरु आहे. स्वयम हा स्वतःच्या कारमध्ये कारचालकासह परीक्षा केंद्र असलेल्या पोद्दार शाळेत परीक्षेसाठी गेला होता. परीक्षा संपल्यानंतर कारमधून त्याचे अपहरण करण्यात आले. (Kidnappers kidnap a 10th standard student in Jalna)

या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, परीक्षेची वेळ संपूनही स्वयम घरी न आल्याने त्याच्या कुटुंबीयांनी कारचालकाला फोन करून विचारणा केली असता अपहरण कर्त्याने चार कोटी आणून द्या, तरच मुलाला घेऊन जा असं म्हटल्याचे कारचालकाने सांगितले. त्यानंतर अपहरण झालेल्या विद्यार्थ्याच्या वडिलांनी तातडीने तालुका जालना पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य पाहून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत सर्वत्र नाकाबंदी केली. गाडीच्या ड्रायव्हरच्या फोनचे लोकेशन ट्रेस केले असता ते अंबड तालुक्यातील शहापूर येथे दिसत असल्याने पोलिसांनी तिथे धाव घेत कारचा शोध घेतला. त्यावेळी स्वयम व कारचालक दोघे आढळून आले.

क्लिक करा आणि वाचा- ‘शिवसेनेला संभाजीनगर म्हणायला आवडत असेल, पण नामांतर सरकारच्या अजेंड्यावर नाही’

पोलिसांनी स्वयमची सुटका केली असून कारचालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पोलीस इतर आरोपींचा शोध घेत आहेत. या घटनेची माहिती मिळताच व्यापारीवर्गात खळबळ उडाली असून पालक देखील भयभीत झाले आहेत.

क्लिक करा आणि वाचा- जालना शहर हादरलं; पतीकडून पहिल्या पत्नीच्या मदतीने दुसऱ्या पत्नीसह मुलीची हत्या

प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती आर. रागासुधा यांनी विद्यार्थ्याला भेटून धीर देत आस्थेने चौकशी केली. पोलीस प्रशासनाने तातडीने पावले उचलल्याचे अपहरणकर्त्यांचा मोठा डाव उधळला गेल्याने स्वयमच्या पालकांनी सांगितले. त्यांनी पोलीस अधीक्षक आर. रगासुधा यांची भेट घेत पोलिसांचे आभार मानले आहेत. पोलीस उर्वरित अपहरणकर्त्यांचा शोध घेत आहेत. आणखी कोण कोण यात सामील आहेत हे लवकरच स्पष्ट होईल.

क्लिक करा आणि वाचा- जालना जिल्ह्यात दोन गटांमध्ये राडा: पोलिसांवरही दगडफेक; गोळीबारात ५ जखमीSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

en_USEnglish
%d bloggers like this: