हृता दुर्गुळे झाली मिसेस प्रतिक शाह, मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला लग्नसोहळा

हृता दुर्गुळे झाली मिसेस प्रतिक शाह, मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला लग्नसोहळा
हृता दुर्गुळे झाली मिसेस प्रतिक शाह, मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला लग्नसोहळा


मुंबई : छोट्या पडद्यावरील ‘फुलपाखरू’ आणि ‘मन उडू उडू झालं’ मालिकांमधून हृता दुर्गुळे घराघरात लोकप्रिय झाली आहे. आपल्या लाघवी सौंदर्यानं आणि अभिनयानं हृतानं प्रत्येकाच्या मनामनात घर केलं आहे. विशेषतः तरुणांच्या मनात हृताचं तर खास स्थान आहे. हजारो तरुणांचा हृदयभंग करून हृता दुर्गुळे हिनं तिचा बॉयफ्रेंड प्रतिक शाह याच्याबरोबर आज सप्तपदी चालत त्याला आयुष्याचा जोडीदार म्हणून स्वीकार केला आहे. प्रतिक आणि हृताच्या लग्नसोहळ्याला दोघांच्या जवळचे नातेवाईक, मित्रमंडळी उपस्थित होते.

अर्थात हृतानं एक खास फोटो शेअर करत लग्न झाल्याचं चाहत्यांना सांगितलं. फोटो शेअर करताच चाहत्यांनी नवविवाहित दांपत्याला पुढील आयु्ष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

हृताचा नवरा प्रतिक शाह हा हिंदी मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री मुग्धा शाह यांचा मुलगा आहे. प्रतिकनं आतापर्यंत अनेक लोकप्रिय हिंदी मालिकांचं दिग्दर्शन केलं आहे. ‘तेरी मेरी इक जिंदगी’, ‘बेहद २’, ‘बहु बेगम’, ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’, ‘एक दिवाना था’ यांसारख्या मालिकांचा समावेश आहे. प्रतिक शाह हे हिंदी मालिकाविश्वातील एक प्रसिद्ध नाव आहे.

तर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असलेल्या हृताने मास मीडिया या पदवी अभ्यासक्रमातील जाहिरात क्षेत्रात शिक्षण घेतलं आहे. हृता दुर्गुळे ‘दुर्वा’ या मालिकेतून सर्वांसमोर आली होती. या मालिकेनं जवळपास हजार भागांचा टप्पा पूर्ण केला होता. त्यानंतर ती ‘फुलपाखरू’ मालिकेत ती मुख्य भूमिकेत होती. या मालिकेपासून तरुणाईमध्ये तिची प्रचंड क्रेझ निर्माण झाली आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

en_USEnglish
%d bloggers like this: