फक्त ‘त्या’ एका चेंडूमुळे केकेआरचा संघ आयपीएमधून आऊट, लखनौ दिमाखात प्ले ऑफमध्ये दाखल

फक्त ‘त्या’ एका चेंडूमुळे केकेआरचा संघ आयपीएमधून आऊट, लखनौ दिमाखात प्ले ऑफमध्ये दाखल
फक्त ‘त्या’ एका चेंडूमुळे केकेआरचा संघ आयपीएमधून आऊट, लखनौ दिमाखात प्ले ऑफमध्ये दाखल


नवी मुंबई : फक्त एका चेंडूमुळे केकेआरचा संघ आयपीएलमधून आऊट झाल्याचे पाहायला मिळाले. क्विंटन डीकॉकच्या नाबाद १४० धावांच्या जोरावर लखनौने प्रथम फलंदाजी करताना केकेआरपुढे २११ धावांचे आव्हान ठेवले होते. केकेआरच्या संघाने चांगली लढत दिली आणि जिंकता जिंकता त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. कारण अखेरच्या चेंडूवर तीन धावांची गरज असताना लखनौच्या मार्कस स्टॉइनिसने उमेश यादवला क्लीन बोल्ड केले आणि केकेआरचे आव्हान संपुष्टात आले. लखनौने यावेळी दोन धावांनी विजय साकारला आणि त्यांनी प्ले ऑफमधील स्थान निश्चित केले. पण यावेळी फक्त एका चेंडूमुळे हा सामना फिरल्याचे पाहायला मिळाले. हा चेंडू लखनौ फलंदाजी करत असताना तिसऱ्या षटकात पडला. उमेश यादवच्या तिसऱ्या षटकात क्विंटन डीकॉकचा १२ धावांवर असताना झेल सुटला आणि त्यानंतर त्याने नाबाद १४० धावा फटकावल्या या एका चेंडूमुळेच केकेआरचा संघ आयपीएलबाहेर गेला.

लखनौच्या आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरची वाईट सुरुवात झाली. कारण त्यांना पहिल्याच षटकात धक्का बसला. कारण चौथ्याच चेंडूवर सलामीवीर वेंकटेश अय्यर बाद झाला आणि त्याला भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर तिसऱ्या षटकात केकेआरला दुसरा धक्का बसला आणि त्यांची २ बाद ९ धावा अशी अवस्था झाली. पण त्यानंतर नितीश राणा आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांनी केकेआरचा डाव सावरला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ५६ धावांची भागीदारी रचली. पण त्यानंतर राणा ४२ धावांवर बाद झाला आणि ही जोडी संपुष्टात आली. त्यानंतर अय्यरने संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत अर्धशतक झळकावले. पण अर्धशतकानंतर त्याला एकही धाव करता आली नाही. अय्यरने यावेळी २९ चेंडूंत चार चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ५० धावांची खेळी साकारली.

क्विंटन डीकॉकने सावधपणे सुरुवात केली असली तरी त्याला तिसऱ्या षटकात जीवदान मिळाले. डीकॉक त्यावेळी १२ धावांवर फलंदाजी करत होता. हा झेल सुटला आणि त्यानंतर लखनौच्या संघाचे नशिबच बदलले. कारण त्यानंतर डीकॉकने धडाकेबाज फटकेबाजी करायला सुरुवात केली. डीकॉकने ३६ चेंडूंत आपले अर्धशतक साकारले. अर्धशतक साकारताना त्याच्या खात्यामध्ये चार चौकार आणि दोन षटकार होते. त्यानंतर लखनौच्या संघाने ७७ चेंडूंमध्ये आपले शतक फलकावर लावले. डीकॉक पाठोपाठ यावेळी राहुलनेही अर्धशतक पूर्ण केले. राहुलला अर्धशतक पूर्ण करण्यासाठी यावेळी ४१ चेंडू लागले, यामध्ये दोन चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. त्यानंतर डीकॉकने शतक झळकावले आणि त्यानंतर तो प्रत्येक चेंडूवर मोठे फटके मारायला लागला. डीकॉकने यावेळी ७० चेंडूंत १० चौकार आणि १० षटकारांच्या जोरावर नाबाद १४० धावांची धडाकेबाज खेळी साकारली. त्यामुळेच लखनौच्या संघाला केकेआरपुढे २११ धावांचे आव्हान ठेवता आले. लखनौचा कर्णधार लोकेश राहुलने यावेळी नाबाद ६८ धावांची खेळी साकारली.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

en_USEnglish
%d bloggers like this: