खेळताना गळफास लागल्याने चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू; परिसरात हळहळ

खेळताना गळफास लागल्याने चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू; परिसरात हळहळ


खामगाव : खांबाला रुमाल बांधून खेळत असताना एका बारा वर्षीय मुलाला गळफास लागला. ही बाब लक्षात येताच त्याला खाली उतरवून दवाखान्यात येण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ही घटना खामगावातील मीरानगरात दुपारी साडेचार वाजता घडली. पूर्वेश वदेश आवटे असे या मुलाचे नाव आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (a 12 year old boy died after being strangled while playing)

पूर्वेश हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. आपला एकुलता एक मुलगा सोडून गेल्याने पालकांना मानसिक धक्का बसला आहे. काल १७ मे रोजी दुपारी पूर्वेश आई संगीता यांच्यासह घरीच होता. त्यावेळी आईला बाहेर खेळतो असे सांगून तो घराच्या मागे गेला. तेथे त्याने आडव्या लोखंडी पाईपला रुमाल बांधून खेळायला सुरुवात केली. त्यावेळी अचानक गळफास लागला.

क्लिक करा आणि वाचा- तब्बल २०० क्विंटल कांदा मोफत वाटला, व्यथित झालेल्या शेतकऱ्याने सांगितलं…

ही बाब आई संगीताच्या लक्षात आल्याने तिने त्याला खाली काढले. दुपारी प्रचंड ऊन असल्याने तसेच आजुबाजुला कुणी नसल्याने संगीताने त्याचे वडील वंदेश यांना बोलावण्यासाठी त्यांच्या कामाचे ठिकाण गाठले. वडील घरी आल्यानंतर त्याला दवाखान्यातनेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

क्लिक करा आणि वाचा- हिंदू-मुस्लिम हे तर रक्ताचं नातं! बुलडाण्यातल्या घटनेने तुम्हीही असंच म्हणाल…

खासगी कंपनीत काम करणारे वडील फावल्या वेळात भाजीपाला व्यवसाय करतात. तर आई घरकाम करते. या कुटुंबात पूर्वेश एकटाच होता. तर दोन वर्षापूर्वी या दाम्पत्याला झालेल्या मुलीचेही निधन झाले आहे. या घटनेने आई वडील दोघांनाही मोठा मानसिक धक्का बसला असून समाजमन हळहळले आहे.

क्लिक करा आणि वाचा- बुलडाण्यात हिंदू-मुस्लिम एकोप्याचं अनोखं दर्शन, मुस्लिम बांधवांना भोंगा भेटSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

en_USEnglish
%d bloggers like this: