KKR vs LSG: लखनौचा कोलकात्यावर दोन धावांनी विजयस, वाचा सामन्यातील दहा महत्वाचे मुद्दे

KKR vs LSG: लखनौचा कोलकात्यावर दोन धावांनी विजयस, वाचा सामन्यातील दहा महत्वाचे मुद्दे
KKR vs LSG: लखनौचा कोलकात्यावर दोन धावांनी विजयस, वाचा सामन्यातील दहा महत्वाचे मुद्दे
KKR vs LSG: क्विंटन डी कॉक (Quinton de Kock) आणि केएल राहुलची (KL Rahul) वादळी खेळी आणि मोहसिन खान (Mohsin Khan) आणि मार्कस स्टॉयनिसच्या भेदक माऱ्यापुढं कोलकात्याचा (KKR) संघानं गुडघे टेकले. प्रथम फलंदाजी करत लखनौच्या संघानं कोलकात्यासमोर 20 षटकात एकही विकेट गमावता कोलकात्यासमोर 211 धावांचं विशाल लक्ष्य ठेवलं. त्यानंतर भेदक गोलंदाजी करत कोलकात्याच्या संघाला 208 धावांवर रोखलं. अखेरच्या षटकात कोलकात्याच्या संघाला 21 धावांची गरज असताना मार्कस स्टॉयनिसनं उत्कृष्ट गोलंदाजी केली. लखनौच्या संघानं हा सामना फक्त दोन धावांनी जिंकला.

कोलकाता- लखनौ यांच्यातील सामन्याचे दहा मुद्दे-

- कोलकात्याविरुद्ध नाणेफेक जिंकून लखनौच्या संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

- लखनौकडून फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या क्विंटन डी कॉक आणि केएल राहुलं तुफानी फलंदाजी करत संघाचा डाव 210 वर नेला.

- या सामन्यात क्विंटन डी कॉकनं 70 चेंडूत नाबाद 140 धावा केल्या. तर, केएल राहुलनं 51 चेंडूत नाबाद 68 धावांची खेळी केली.

- कोलकात्यासाठी टीम साऊथी सर्वात महागडा गोलंदाज ठरला आहे. त्यानं चार षटकात 14.20 च्या सरासरीनं 57 धावा दिल्या आहेत.

- केएल राहुलनं प्रथम फलंदाजी करण्याचा  घेतलेला निर्णय लखौनच्या बाजूनं योग्य ठरला.

- लखनौनं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकात्याच्या संघाची सुरुवात खराब झाली. कोलकात्याची सलामीवीर व्यंकटेश अय्यर (0 धाव) आणि अभिजीत टोमर (4 धावा) स्वस्तात माघारी परतले.

- नितीश राणा आणि कोलकात्याचा कर्णधार श्रेयस अय्यरनं संघाचा डाव सावरला.त्यानंतर दोघेही बाद झाले.

- दरम्यान, अखेरच्या षटकात कोलकात्या विजयासाठी 21 धावांची गरज असताना रिंकू सिंहनं आक्रमक फलंदाजी केली.

- अखेरच्या षटकातील पहिल्या चार चेंडूत त्यानं 18 धावा कुटल्या. परंतु, दोन चेंडूत तीन धावांची आवश्यकता असताना तो बाद झाला. त्यानंतर अखेरच्या चेंडूत तीन धावांची गरज असताना मार्कस स्टॉयनिसनं कुलदीप यादवला बाद केलं.

- लखनौकडून मोहसीन खान आणि मार्कस स्टॉयनिसनं प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतल्या.

हे देखील वाचा-

KKR vs LSG: क्विंटन डी कॉकची वादळी खेळी, केएल राहुलचं तुफानी अर्धशतक; लखनौचं कोलकात्यासमोर 211 धावांचं लक्ष्य

Kane Williamson On Umran Malik: उमरान मलिकबद्दल हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनचं मोठं वक्तव्य

IPL 2022: हैदराबादचा ‘हा’ स्टार फलंदाज लवकरच टीम इंडियात दिसणार, रवी शास्त्रींची भविष्यवाणी

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

en_USEnglish
%d bloggers like this: