नवज्योतसिंग सिद्धूंची तुरुंगवारी अटळ; सर्वोच्च न्यायालयाचा तातडीने दिलासा देण्यास नकार

नवज्योतसिंग सिद्धूंची तुरुंगवारी अटळ; सर्वोच्च न्यायालयाचा तातडीने दिलासा देण्यास नकार


चंदीगड : पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू ( navjot singh sidhu ) यांची तुरुंगवारी अटळ आहे. सर्वोच्च न्यायालयाने क्युरेटिव्ह याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. सिद्धूंना आता न्यायालयाला ( navjot singh sidhu moves supreme court ) शरण जावं लागणार आहे. अन्यथा पंजाब पोलिसांकडून त्यांच्यावर अटकेची कारवाई होऊ शकते.

आम्ही हे प्रकरण सरन्यायाधीशांकडे पाठवत आहोत. ते त्यावर सुनावणी घेण्याचा निर्णय घेतील, असं सिद्धूंचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती ए.एम. खानविलकर यांनी सांगितलं. सिद्धूंनी प्रकृतीच्या कारणास्तव न्यायालयाकडे एक आठवड्याची मुदतवाढ मागितली होती.

क्युरेटिव्ह पिटीशन म्हणजे काय?

क्युरेटिव्ह पिटिशन हा कोणत्याही दोषीला दिलासा देणारा शेवटचा मार्ग असतो. यामध्ये सर्वोच्च न्यायालय कलम १४२ चा वापर करते. अलिकडेच सर्वोच्च न्यायालयाने समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यासाठी आणि राजीव गांधी हत्येतील दोषीला सोडण्यासाठी या कलमाचा वापर केला होता. कलम १४२ नुसार कोणत्याही प्रलंबित प्रकरणावर सर्वोच्च न्यायालय आपल्या अधिकाराचा वापर करून निर्णय देते.

सिद्धू समर्थक पतियाळात

सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी ३४ वर्षे जुन्या एका प्रकरणात सिद्धूंना एक वर्षाची शिक्षा सुनावली. दुसरीकडे शरणागती वेळी सिद्धूंच्या समर्थकांना पतियाळात बोलावण्यात आले आहे. पतियाळात जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष नरिंदर पाल लाली यांनीही यासंदर्भात कार्यकर्त्यांना संदेश पाठवला आहे. सिद्धू सध्या त्यांच्या पतियाळा येथील घरी आहेत. त्यांचे समर्थक काँग्रेस नेते तिथे पोहोचू लागले आहेत.

सिद्धूंना एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश प्रथम पंजाब-हरयाणा उच्च न्यायालयात पोहोचणार आहे. तेथून त्यांना पतियाळाच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयात पाठवण्यात येणार आहे. सिद्धू स्वत: शरण गेल्यास पुढील प्रक्रिया केली जाईळ. अन्यथा पोलिसांना अटकेची कारवाई करावी लागेल.

सिद्धूंना एक वर्षाची शिक्षा, ३४ वर्षे जुन्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने झटका

‘काल हत्तीवर चढले, आज त्यांची तब्येत बिघडली’

युवा अकाली दलाचे प्रमुख परमबंससिंग बंटी रोमाना यांनी सिद्धूंची खिल्ली उडवली आहे. हत्तीवर चढत असताना त्यांची तब्येत बरी होती. आणि आता शरण जाताना भीती वाटतेय. आम्ही कायद्याचा पूर्ण आदर करतो, असे सिद्धू काल मोठ्या जोशात म्हणाले होते, आता काय झालं? असा सवाल त्यांनी केला आहे.

अटक होणार की शरण जाणार?, सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर सिद्धूंची प्रतिक्रिया…

सिद्धूंवर शस्त्रक्रिया झाली आहे, तुरुंगात जाण्याची भीती नाही: मीडिया सल्लागार

सिद्धूंनी प्रतिकात्मक निदर्शन केले. त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. ज्यासाठी सध्या उपचार सुरू आहेत. सिद्धू गव्हाची चपाती खाऊ शकत नाहीत. ते खास आहार घेतात. त्यांना यकृताचा त्रास आहे. त्यांना पायाचाही त्रास आहे. सिद्धू तुरुंगात जाण्याला घाबरत नाहीत. सिद्धू कधीही शरण येण्यास तयार आहेत, असे मीडिया सल्लागार सुरिंदर डल्ला म्हणाले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

en_USEnglish