श्रीकृष्ण जन्मभूमीवर बांधलीये इदगाह मशीद?; मंदिर- मशीद वाद नेमका काय?

श्रीकृष्ण जन्मभूमीवर बांधलीये इदगाह मशीद?; मंदिर- मशीद वाद नेमका काय?

[ad_1]

मथुराः वाराणसीतील काशी विश्वेशर मंदिराच्या बाजूला उभ्या असलेल्या ज्ञानवापी मशिदीवरुन सध्या देशातील वातावरण तापलं आहे. ज्ञानवापी मंदिराच्या सर्व्हेक्षणात शिवलिंग सापडल्याचा दावा केला जात आहे. ज्ञानवापी मंदिर की मशिद हा वाद सुरु असतानाच आता मथुरात श्री कृष्ण जन्मभूमी आणि इदगाह मशिदीचा वाद कोर्टात पोहोचला आहे. या याचिकेवर सुनावणी घेण्यास मथुरा जिल्हा न्यायालयाने मंजुरी दिली आहे. काय आहे हा वाद? जाणून घेऊया

शाही इदगाह मशिद ज्या जागेवर उभी आहे ती जमीनीचा मालकी हल्ल हिंदू पक्षाला सोपवण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. शाही १७व्या शतकात औरंगजेबच्या आदेशानुसार श्रीकृष्ण जन्मभूमीच्या बाजूला असलेले मंदिर तोडून ईदगाह मशीद बांधण्यात आली होती, असा दावा केला जातो. उत्तर प्रदेशातील मथुरा येथील कृष्ण जन्मभूमी संकुलाची १३.३७ एकर जागा आहे. तेथेच केशव देव मंदिराच्या जागेवर ही मशीद उभारण्यात आल्याचा दावा करीत ही मशीद हटवण्याची मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. यापूर्वी तीन वेळा यासंदर्भात याचिका करण्यात आल्या होत्या. एका दिवाणी न्यायालयाने याच स्वरूपाची याचिका फेटाळली होती. त्यानंतर ती मथुरेतील दिवाणी न्यायालयात करण्यात आली आहे. मुघल सम्राट औरंगजेबाने १६६९मध्ये उभारलेली ही मशीद कृष्ण जन्मभूमीच्या जागेवरून हटवण्यात यावी, अशी मागणी या याचिकांमध्ये करण्यात आली होती.

वाचाः ई-दुचाकी खरेदी करण्याचा विचार करताय; त्याआधी वाचा ही महत्त्वाची बातमी

वादग्रस्त भूमीवर कोणाचा अधिकार

शाही इदगाह मशीद १६७० मध्ये औरंगजेबाने बांधली होती. मशीद बांधण्याआधी त्या जागी एक प्राचीन मंदिर होते. १८१५मध्ये वारणसीचे राजा पटनी मल यांनी १३.३७ एकर जमीन ईस्ट इंडिया कंपनीने एक लिलावात खरेदी केली होती. त्याच जमिनीवर इदगाह मशीद आणि श्रीकृष्ण मंदिर आहे.

राजा पटनी मल यांनी ही जमिन जुगल किशोर बिडला यांना विकली होती. यानंतर पंडित मदन मोहन मालवीय, गोस्वामी गणेश दत्त आणि भीकेन लालजी आत्रेय यांच्यानाववर जमिनीची नोंदणी झाली. किशोर यांनी श्रीकृष्ण जन्मभूमी ट्रस्टच्या नावावर केली.

१९६८ला झाला होता सामंजस्य करार

जमीनीच्या मालकीमुळं होणारा वाद टाळण्यासाठी १२ ऑक्टोबर १९६८ रोजी श्री कृष्ण जन्मस्थान सेवा संस्थान आणि शाही मस्जिद इदगाह ट्रस्ट यांच्यात सामंजस्य करार झाला.या करारात १३. ३७ एकर जमिनीवर मंदिर आणि मशिद दोन्ही राहतील. त्यानुसार दोन्ही प्रार्थानास्थळांमध्ये एक सीमा ठरवण्यात आली. श्रीकृष्ण जन्मस्थान ट्रस्टला हा सामंज्यस्य करार मान्य नव्हता आणि त्याविरोधात ते कोर्टात गेले. मात्र प्लेसेस ऑफ वर्शीप अॅक्ट १९९२ने ही केस तिथंच थांबली. कारण या कायद्याने प्राथनास्थळाचा दर्जा बदलता येणार नव्हता.

दरम्यान, हा सामज्यंस करार धोक्याने केला होता आणि बेकायदेशीर होता. कोणत्याही प्रकारे देवांचे अधिकार सामज्यंसाने सपुष्टांत आणू शकत नाही. कारण देवता कारवाईचा हिस्सा नसतात, असं याचिकाकर्त्यांनी म्हटलं आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *