ज्ञानवापी मशिदः १९३६मधील ब्रिटिश ट्रायल कोर्टाच्या ‘त्या’ निर्णयामुळं हिंदू पक्षाची बाजू वरचढ?

ज्ञानवापी मशिदः १९३६मधील ब्रिटिश ट्रायल कोर्टाच्या ‘त्या’ निर्णयामुळं हिंदू पक्षाची बाजू वरचढ?

[ad_1]

नवी दिल्लीः ज्ञानवापी मशीद-शृंगार गौरी मंदिरप्रकरणी येथील न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सोमवार २३ मे रोजी सुनावणी होत आहे. वाराणसीच्या स्थानिक न्यायालयात ही सुनावणी होणार आहे. दरम्यान, ज्ञानवापी प्रकरणी कोर्टात धाव घेणाऱ्या पाच महिलांनी सर्वोच्च न्यायालयात १९३६मधील ब्रिटिश ट्रायल कोर्टाच्या निर्णयाचा उल्लेख केला होता. याचिकाकर्त्यांनी ज्ञानवापी मशिदीची संपूर्ण जमीन काशी विश्वनाथ मंदिराची आहे, असा दावा सर्वोच्च न्यायालयात करण्यात आला आहे.

सर्वोच्च न्यायालयात याचिकाकर्त्यांनी ब्रिटिश सरकारच्या ट्रायल कोर्टाने केलेल्या वक्तव्याचा हवाला देत दावा केला आहे. यामध्ये मशिदीची संपत्ती वक्फची नाहीये, असा आदेश देत कोर्टाने १९३६मध्ये मुस्लिम व्यक्तीची याचिका कोर्टाने फेटाळली होती. असं वक्तव्य वकील विष्णु शंकर जैन यांनी म्हटलं होतं.

वाचाः श्रीकृष्ण जन्मभूमीवर बांधलीये इदगाह मशीद?; मंदिर- मशीद वाद नेमका काय?

वाराणसीच्या अंजुमन इंतजामिया मशिद कमिटीने ज्ञानवापीच्या सर्वेक्षणाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. याबाबत कोर्टात बाजू मांडताना हिंदू पक्षाचे वकील विष्णु शंकर जैन यांनी ब्रिटिश सरकारच्या काळातील एका खटल्याचा हवाला देत म्हटलं आहे की, ब्रिटिश सरकारने योग्य निर्णय घेतला होता. ती जमिन मंदिराचीच आहे कारण तेव्हा वक्फ संपत्ती नव्हती, त्यामुळं त्या जमिनीवर मुसलमान मशिदीचा दावा करु शकत नाही, असं वकिल विष्णु शंकर जैन यांनी कोर्टात म्हटलं.

औरंगजेबाने तोडली मशिद

मुगल सम्राट औरंगजेबने वाराणसीचं विश्वेश्वर (काशी विश्वनाथ) मंदिर ९ एप्रिल १६६९ साली तोडण्याचे आदेश दिले होते. तसंच, तत्कालीन शासनकर्ता वा त्यानंतरचे राज्यकर्त्यांनी ती वादग्रस्त जागेवर वक्फ बनवण्याची वा कोणत्याही मुस्लिम संस्थेला जमीन सोपवण्याचे आदेश जारी करण्यात आल्याची, कोणतीही नोंद इतिहासात आढळत नाही, असं याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.

वाचाः ज्ञानव्यापी सर्व्हेः मंदिराचे अवशेष, भिंतीवर शेषनाग- कमळाची कलाकृती; कोर्ट कमिश्नरचा अहवालात दावा

वक्फ म्हणजे काय?

वक्फ म्हणजे कोणत्याही धार्मिक कार्यासाठी करण्यात आलेले दानधर्म, असं मुस्लिम समुदायातिल जाणकार म्हणतात. इस्लामला मानणारे जर धार्मिक कार्यासाठी करणारे दान करत असतील तर त्याला वक्फ असं म्हणतात. त्याअंतर्गंत, शैक्षणिक संस्था, कब्रस्तान, मशीद आणि अन्य संस्था येतात.

दरम्यान, ज्ञानवापीप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या दोन याचिकांवर बुधवारी सुनावणी होणार होती. परंतु वकिलांच्या संपामुळे ती होऊ शकली नाही. त्यापूर्वी रेखा पाठक, मंजू व्यास व सीता साहू यांनी मंगळवारी या स्थानिक न्यायालयात एक याचिका दाखल केली. शिवलिंग जेथे आढळले त्याच्या पूर्वेस एक तळघर असून ते दगड-विटा व सीमेंटच्या आधारे बंद करण्यात आले आहे, असा दावा या तिघींनी केला आहे. तसेच, नंदीच्या मूर्तीसमोरही एक भिंत व तळघर असून तेही दगड-विटांनी बंदिस्त करण्यात आले आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. या याचिकेवर आता २३ मे रोजी सुनावणी होईल.

वाचाः ज्ञानवापी मशिदीत सापडलेले शिवलिंग पाचूचे?; जाणून घ्या इतिहास

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *