सावधान! गुजरातमध्ये सापडला ओमिक्रॉन BA.5चा दुसरा रुग्ण; देशात एकूण किती रुग्ण

सावधान! गुजरातमध्ये सापडला ओमिक्रॉन BA.5चा दुसरा रुग्ण; देशात एकूण किती रुग्ण

[ad_1]

अहमदाबादः करोना महामारीचा संसर्ग देशात आटोक्यात येत असताना एक चिंताजनक बातमी समोर येत आहे. करोनाचा विषाणूचा ओमिक्रॉन व्हेरियंटचा उपप्रकार BA.5चा भारतात शिरकाव झाला आहे. गुजरातमधील एका व्यक्तीला या विषाणूची लागण झाली आहे. BA.5 विषाणूची लागण झालेला पहिला रुग्ण तेलंगणामध्ये आढळला होता. आता देशात या विषाणूची बाधा झालेले दोन रुग्ण आढळले आहेत.

वडोदरातील रुग्णाचे नासोफरींजल सँपल म्हणजे नाकावाटे नमुने घेतले होते. त्यानंतर २३ मे रोजी हरियाणातील भारतीय बायोलॉजिकल डेटा सेंटरमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यानंतर या रुग्णाला BA.5 या विषाणूची लागण झाल्याचे निदान झालं आहे.

वाचाः ज्ञानवापीचा फैसला ठरणार ऑर्डर ७ नियम ११ अंतर्गंत; जाणून घ्या सविस्तर

ओमिक्रॉनचा उपप्रकार चिंताजनक: WHO

जागतिक आरोग्य संघटनेने ओमिक्रॉनचे दोन्ही उपप्रकार बीए.४ आणि बीए.५ हे चिंताजनक असल्याचं म्हटलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयबीडीसीने रुग्ण ओमिक्रॉन बीए.५ व्हेरियंटने बाधित असल्याचं स्पष्ट केलं आहे.

दरम्यान याआधी हैदराबादमध्ये ओमिक्रॉनचा उपप्रकार बीए.४ चा रुग्ण सापडला होता. अफ्रिकेहून आलेल्या एका प्रवाशाला ओमिक्रॉनच्या बीए.४ व्हेरियंट सापडला आहे. हैदराबाद विमानतळावर आल्यानंतर त्याची चाचणी करण्यात आल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळावर ९ मे रोजी या रुग्णांची चाचणी करण्यात आली होती. मात्र, रुग्णामध्ये कोणतेही लक्षण दिसून आले नव्हते. दरम्यान, हा प्रवासी १६ मेला पुन्हा अफ्रिकेला गेला.

वाचाः केदारनाथमध्ये ब्लॉगर आणि युट्यूबरवर बंदी घालणार?; समोर आलं धक्कादायक कारण

अफ्रिकेत सापडला होता पहिला रुग्ण

जानेवारीमध्ये पहिल्यांदा दक्षिण अफ्रिकेत व्हेरियंट बीए.४चा पहिला रुग्ण सापडला होता. त्यानंतर वेगाने इतर देशातही त्याचा फैलाव झाला. एक डझनपेक्षा अधिक देशात ओमिक्रॉनचा संसर्ग झाला होता. मात्र, भारतात आतापर्यंत एकही रुग्ण आढळला नव्हता. मात्र, आता पहिला रुग्ण सापडल्याने देशातही संसर्गाची भीती व्यक्त केली जात आहे.

वाचाः बिहारमध्ये राजकीय भूकंप? पुढील ७२ तास महत्त्वाचे; नितीश कुमारांचा आमदारांना महत्त्वाचा आदेश

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *