कुठे आहे ऐश्वर्य मंडप, दडलाय खजिना; ज्ञानवापी संदर्भात मोठा दावा

कुठे आहे ऐश्वर्य मंडप, दडलाय खजिना; ज्ञानवापी संदर्भात मोठा दावा

[ad_1]

वाराणसीः वाराणसी स्थानिक न्यायालय ज्ञानवापी प्रकरणी आज फैसला सुनावण्याची शक्यता आहे. मात्र, त्यापूर्वीच काशी विश्वनाथ मंदिरातील महंतांनी एक दावा केला आहे. महंत कुलपति तिवारी यांनी ज्ञानवापी मशिदीतील तळघरात खजिना असल्याचा दावा केला आहे. त्या तळघराला त्यांनी ऐश्वर्य मंडप असंही नाव दिलं आहे. (Aishwarya Mandap in gyanvapi mosque)

काशी विश्वनाथ मंदिराचे महंत कुलपति तिवारी यांनी केलेल्या दाव्यानुसार, ज्ञानवापी परिसरातील पूर्वेकडील तळघरात एक खजिना दडलाय. महंतांनी यावेळी धर्मग्रंथाचा दाखलादेखील दिला आहे. संधु व स्कंद पुराणातील श्लोकांचा हवाल्याने मंहतांनी आपला दावा खरा असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी म्हटलंय की, काही धर्मग्रंथांनुसार ज्ञानवापीतील पूर्वेकडील भागात ऐश्वर्य मंडप गाडला गेला आहे. जे आता तळघर आहे आणि त्याखालीच खजिना दडला आहे, असा दावा त्यांनी केला आहे.

वाचाः ज्ञानवापीचा फैसला ठरणार ऑर्डर ७ नियम ११ अंतर्गंत; जाणून घ्या सविस्तर

आणखी एक शिवलिंग सापडल्याचा दावा

खजिना असल्याचा दावा करणाऱ्या विश्वनाथ महंत यांनी याअगोदर ज्ञानवापीमध्ये आणखी एक शिवलिंग असल्याचा दावा केला होता. ज्या ठिकाणी आता वझुखाना आहे त्याठिकाणीच शिवलिंग असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मात्र, याआधीच तिथे शिवलिंग की कारंजा यावरुन वाद सुरू आहे. महंत यांनी दावा केलेले शिवलिंगदेखील नंदीच्या मूर्तीसमोरच आहे.

वाचाः जागा मशिदीची नव्हे, भारत सरकारची; कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर

शिवलिंगाची पूजा करण्याची मागणी

ज्ञानवापी मंदिरात सापडलेल्या कथित शिवलिंगाची पूजा करण्याची परवानगी मिळावी, यासाठी काशी विश्वनाथ मंदिराचे महंत डॉक्टर कुलपति तिवारी यांनी कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर मंगळावारी वाराणसीतील स्थानिक न्यायालयात सुनावणी होणार आहे.

वाचाः ज्ञानवापी मशिदः १९३६मधील ब्रिटिश ट्रायल कोर्टाच्या ‘त्या’ निर्णयामुळं हिंदू पक्षाची बाजू वरचढ?

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *