कुतुबमिनारमध्ये पूजेचा अधिकार देता येणार नाही; पुरातत्व विभागाने सांगितलं कारण

कुतुबमिनारमध्ये पूजेचा अधिकार देता येणार नाही; पुरातत्व विभागाने सांगितलं कारण

[ad_1]

नवी दिल्लीः दिल्लीतील प्रसिद्ध कुतुबमिनार येथे पुजा करण्याची परवानगीची मागणी करणाऱ्या हिंदु पक्षाच्या याचिकेवर भारतीय पुरातत्व विभागाने जोरदार आक्षेप घेतला आहे. कुतुबमिनारची ओळख बदलता येणार नाही, असं पुरात्तव विभागाने कोर्टात दाखल केलेल्या आपल्या जबाबात म्हटलं आहे.

दिल्लीतील साकेत कोर्टात कुतुबमिनार परिसरात हिंदू देवी- देवतांची पूजा करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी याचिका दाखल करण्यात आली होती. कुतुबमिनार परिसरात हिंदू देवी- देवतांच्या अनेक मूर्ती असल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला आहे.

पूजेचा अधिकार देता येणार नाही: ASI

हिंदू पक्षकारांनी दाखल केलेल्या याचिकेवर भारतीय पुरातत्व विभागाने साकेत कोर्टात उत्तर दिलं आहे. कुतुबमिनारला १९१४मध्ये संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आलं आहे. त्यामुळं कुतुबमिनारची ओळख आता बदलता येणार नाही. तसंच, पुजेचे अधिकारही देता येणार नाही, असं एएसआयने स्पष्ट केलं आहे. त्याचबरोबर, संरक्षित स्मारक म्हणून घोषणा केल्यानंतरही याठिकाणी कधी पूजा करण्यात आली नाही.

वाचाः कुठे आहे ऐश्वर्य मंडप, दडलाय खजिना; ज्ञानवापी संदर्भात मोठा दावा

हिंदू पक्षकारांच्या याचिका कायद्याला धरुन नाहीत. त्याचबरोबर प्राचीन मंदिरे तोडून कुतुब मिनार बांधल्याचा दावा इतिहासाशी संबंधित आहे. त्यामुळं कुतुबमिनारमध्ये कोणालाही पुजा करण्याचा अधिकार नाही. जेव्हापासून संरक्षित स्मारक म्हणून त्याचं संरक्षण करण्या येत आहे तेव्हापासून तिथे कोणत्याही प्रकारची पूजा करण्यात आलेली नाही. अशा परिस्थितीत पुजेसाठी परवानगी देता येणार नाही, असं पुरात्तत्व विभागाने म्हटलं आहे. पुरातत्व संरक्षण अधिनियम १९५८ अंतर्गंत, संरक्षित स्मारकात फक्त पर्यटकांना परवानगी आहे. कोणत्याही धार्मिक कार्यांना नाही, असं पुरातत्व विभागाने म्हटलं आहे.

‘कुतुबमिनार नव्हे, विष्णुस्तंभ’

युनायटेड हिंदू फ्रंटच्या वतीने आज कुतुबमिनार येथे हनुमान चालीसाचे पठण करण्यात आले. ‘कुतुबमिनार हा मुळात विष्णुस्तंभ आहे. या मिनाराच्या बांधकामासाठी २७ जैन आणि हिंदू मंदिरांना जमीनदोस्त करण्यात आले,’ असा दावा या संघटनेने केला आहे. या परिसरातील देवी-देवतांच्या मूर्तींचा जीर्णोद्धार करण्यात यावा, अशी मागणी या संघटनेने केली आहे.

वाचाः ज्ञानवापी मशिदः १९३६मधील ब्रिटिश ट्रायल कोर्टाच्या ‘त्या’ निर्णयामुळं हिंदू पक्षाची बाजू वरचढ?

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *