लाच मागणाऱ्या आरोग्यमंत्र्याची हकालपट्टी; CM भगवंत मान यांनी घेतला धडाकेबाज निर्णय

लाच मागणाऱ्या आरोग्यमंत्र्याची हकालपट्टी; CM भगवंत मान यांनी घेतला धडाकेबाज निर्णय

[ad_1]

पंजाबः पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी घेतलेल्या एका धडाकेबाज निर्णयाची सध्या जोरदार चर्चा आहे. लाच घेतल्याचा आरोप सिद्ध झाल्याने भगवंत मान यांनी आपल्याच मंत्रिमंडळातील आरोग्यमंत्र्यांची हकालपट्टी केली आहे. मंत्री विजय सिंगला यांना पदाचा राजीनामा देण्याचे आदेश भगवंत मान यांनी दिले आहेत. त्याचबरोबर, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

भगवंत मान यांच्या मंत्रिमंडळात विजय सिंगला आरोग्यमंत्री होते. विजय सिंगला यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते. सिंगला यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाल्यानंतर मान यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे.

वाचाः कुतुबमिनारमध्ये पूजेचा अधिकार देता येणार नाही; पुरातत्व विभागाने सांगितलं कारण

विजय सिंगला यांच्यावर अधिकाऱ्यांकडून एक टक्का कमिशनची मागणी केल्याचा व भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. भ्रष्टाचारांच्या आरोपांनंतर विजय सिंगला यांच्यावर आरोप सिद्ध झाल्यानंतर मुख्यमंत्री भगवंत मान यांनी यावर तात्काळ अॅक्शन घेत मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. मान यांनी सिंगला यांना राजीनामा देण्याच्या सूचना केल्या आहे.

मुख्यमंत्री भगवंत मान यांनी विजय सिंगला यांना मंत्रिमंडळातून बेदखल करताना म्हटलं आहे की, आमच्या मंत्रिमंडळात एक टक्कादेखील भ्रष्टाचाराला थारा नाही. जनतेने आम आदमी पक्षाचे सरकारला मोठ्या अपेक्षेने साथ दिलीये. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत, असं मुख्यमंत्री मान यांनी म्हटलं आहे.

वाचाः कुठे आहे ऐश्वर्य मंडप, दडलाय खजिना; ज्ञानवापी संदर्भात मोठा दावा

दरम्यान, आपल्याच मंत्र्यांला मंत्रिमंडळातून बरखास्त करण्याचा निर्णय पंजाबमध्ये पहिल्यांदाच घेण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांचा हा निर्णय पक्षातील इतर नेत्यांसाठीही कठोर इशारा असल्याचं बोललं जात आहे.

वाचाः ज्ञानवापीचा फैसला ठरणार ऑर्डर ७ नियम ११ अंतर्गंत; जाणून घ्या सविस्तर

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *