आंध्रप्रदेशात कोनासीमा जिल्ह्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यास विरोध, मंत्र्यांचं घर जाळलं

आंध्रप्रदेशात कोनासीमा जिल्ह्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यास विरोध, मंत्र्यांचं घर जाळलं

[ad_1]

अमरावती : आंध्रप्रदेशमधील कोनासीमा जिल्ह्यात मोठा वाद झाल्याचं समोर आलं आहे. आंध्रप्रदेशमधील कोनासीमा जिल्ह्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोनासीमा जिल्हा असं नाव देण्यात आलं आहे. जिल्ह्याचं नाव बदलण्यास विरोध असलेल्या संघटनांनी मोर्चा काढला होता. जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यासाठी मोर्चा काढण्यात आला होता. आंदोलकांनी सरकारी बस जाळण्यात आली. तर, एका मंत्र्याच्या घराची जाळपोळ आणि दगडफेक करण्यात आली आहे. अमलपुरममध्ये हा प्रकार घडल्याची माहिती आहे. कोनासीमा साधना समितीच्या सदस्यांची आणि पोलिसांची झटापट जाल्याचं समोर आलं आहे.

आंध्रप्रदेशमध्ये कोनासीमा या नव्या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली होती. मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या सरकारनं या जिह्याचा नामविस्तार डॉ. बीआर आंबेडकर कोनासीमा असं नाव दिलं होतं. राज्यातील काही समुदायाच्या संघटनांनी याला विरोध केला असल्याची प्राथमिक माहिती आहे. विरोध प्रदर्शनाला हिंसक वळण लागलं असून काही ठिकाणी जाळपोळ आणि दगडफेक करण्यात आली आहे. तर, परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. मंक्षी विश्वरुप यांचं घर पेटवून देण्यात आलं आहे.
संजय पवारांविरोधात धनंजय महाडिक? भाजपची खेळी, निवडणूक राज्यसभेची, मल्ल कोल्हापूरचे!
कोनासीमा जिल्ह्यातील अमलापुरम येथे राज्य सरकारच्या कोनासीमा जिल्ह्याच्या नामविस्ताराला काही संघटनांचा विरोध होता. आज राज्य सरकारच्या निर्णयाचा विरोध करण्यासाठी आंदोलन करण्यात आलं होतं. कोनासीमा जिल्हा साधना समितीच्यावतीनं मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. शहरातील क्लॉक टॉवर जंक्शनजवळ मोर्चेकरी जमले होते आणि त्यांच्या मागणीसाठी घोषणाबाजी करत होते. पोलिसांनी या ठिकाणी दाखल होत काही आंदोलकांना ताब्यात घेतलं होतं. यानंतर पोलिसांसोबत त्यांचा वाद झाला. काही आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेनं निघाले होते. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सुब्बा रेड्डी आंदोलनाच्या ठिकाणी गेले असता त्यावेळी आंदोलकांनी दगडफेक केली. यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला.

आंध्र प्रदेश सरकारनं नुकतंचं कोनासीमा जिल्ह्याचं नाव डॉ. बी.आर.आंबेडकर कोनासीमा जिल्हा असं केलं होतं. सरकारनं या निर्णयावर आक्षेप असल्यास ३० दिवसांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना कळवण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. जिल्ह्यातील काही युवकांच्या संघटनांनी जिल्ह्याचं नाव कोनासीमा ठेवण्याची मागणी केली होती.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *