Bharat Bandh Today 2022 Live : ईव्हीएम बंदी आणि जातनिहाय जनगणनेची मागणी

Bharat Bandh Today 2022 Live : ईव्हीएम बंदी आणि जातनिहाय जनगणनेची मागणी

[ad_1]

नवी दिल्ली : निवडणुकांमध्ये मतदानासाठी होणारा ईव्हीएमचा वापर बंद करावा आणि देशात जातनिहाय जनगणना करण्यात यावी, या मागणीसाठी ‘ऑल इंडिया बॅकवर्ड अँड मायनोरिटी कम्युनिटीज एम्पॉलाइज फेडरेशन’कडून आज ‘भारत बंद’ची हाक देण्यात आली आहे. या बंदला नॅशनल परिवर्तन मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा आणि इतर संघटनांकडून पाठिंबा देण्यात आल्याची माहिती बामसेफचे अध्यक्ष वामन मेश्राम यांनी दिली आहे.

– सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि उद्योग बंद ठेवावेत, असं आवाहन करण्यात आलं आहे.

– ‘या’ मागण्यांसाठी देण्यात आली भारत बंदची हाक : खासगी क्षेत्रात एससी, एसटी आणि ओबीसींसाठी आरक्षण, शेतकऱ्यांना एमएसपी देण्यात यावी, एनआरसी, सीएए आणि एनपीआर लागू करु नये, जुनी पेन्शन योजना लागू करावी, ओबीसींसाठी स्वतंत्र मतदारसंघ, आदिवासींना संरक्षण, करोना प्रतिबंधक लस वैकल्पिक करणे, कामगार कायद्यांतील बदलांना विरोध या मागण्यासांठी भारत बंदची हाक देण्यात आली आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *