चंद्रकांत पाटील म्हणाले, तुम्ही दिल्लीत जा, नाहीतर मसणात जा, सुप्रिया सुळेंचं संयमी उत्तर

चंद्रकांत पाटील म्हणाले, तुम्ही दिल्लीत जा, नाहीतर मसणात जा, सुप्रिया सुळेंचं संयमी उत्तर


मुंबई: राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना भाजप प्रदेशाध्य चंद्रकांत पाटलांची जीभ घसरली. सुप्रिया सुळेंवर पाटलांनी अत्यंत शेलक्या भाषेत टीका केलीये. “तुम्ही घरी जा, स्वयंपाक करा. खासदार असून तुम्हाला कळत नाही. तुम्ही दिल्लीत जा नाहीतर मसणात जा, शोध घ्या आणि आरक्षण द्या”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सध्या राज्यातील तापमान चांगलंच तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरक्षणावरून टीकेची झोड एकमेकांवर उठवली जात आहे. आज भाजपने आक्रमक पवित्रा घेत मंत्रालयावर मोर्चा काढला. यावेळी भाजपच्या अनेक बड्या नेत्यांनी यात सहभाग घेतला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनीही यात सहभाग घेत सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली. तसेच, त्यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर वैयक्तिक टीका केलीये.

हेही वाचा –ओबीसी भाजपचा डीएनए, आरक्षणासाठी ठाकरे सरकारविरोधात लढा तीव्र करणार: फडणवीस

सुप्रिया सुळे आणि चंद्रकांत पाटलांमध्ये तू तू-मै मै

त्यामुळे सुप्रिया सुळे आणि चंद्रकांत पाटलांमध्ये तू तू-मै मै सुरु झाली आहे. ‘मध्यप्रदेशच्या सरकारने दोन दिवसांमध्ये दिल्लीत असं काय केलं ज्यामुळे मध्य प्रदेशात आरक्षण मिळालं’, असं सुप्रिया सुळे म्हणाल्य होत्या. त्यावरून चंद्रकांत पाटलांनी त्यांच्यावर जोरदार टीका केलीये.

“कशाला राजकारणात राहाता, घरी जा, स्वयंकाप करा. खासदार आहात ना तुम्ही, कळत नाही मुख्यमंत्र्याची भेट कशी घ्यायची. कळत नाही एक शिष्टमंडळ पाठवायचं, आता घरी जाण्याची वेळ झालीये. तुम्ही दिल्लीत जा नाहीतर मसणात जा, शोध घ्या आणि आरक्षण द्या”, असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी सुप्रिया सुळेंवर घणाघाती टीका केलीये. त्यावर आता सुप्रिया सुळे यांनी उत्तर देत चंद्रकांत पाटलांच्या बोलण्याचा इतका विचार करत नाही असं म्हटलंय.

हेही वाचा – जातीनिहाय जनगणना करा, सत्य काय ते समोर येऊ द्या, पवारांची केंद्राकडे मोठी मागणी

तो त्यांचा अधिकार, मी त्याचा इतका विचार करत – सुप्रिया सुळे

“आमचं सरकार दडपशाहीचं नाहीये, विरोधकांना तेही भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना असं वाटत असेल की त्यांनी माझ्या विधानावर बोलावं, तर तो त्यांचा अधिकार आहे, त्यात गैर काय, मी इतका काही त्याचा विचार करत नाही, त्यांना वाटलं म्हणून ते बोलले असेल”, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी चंद्रकांत पाटलांच्या टीकेवर संयमी उत्तर दिलं आहे.

‘चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांशी गद्दारी केली, विश्वासघात केला’; खडसेंचे खडेबोलSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

en_USEnglish