Anil Parab: देशमुखांना गजाआड पाठवणाऱ्या ED अधिकाऱ्याकडून अनिल परबांच्या बंगल्याची झाडाझडती

Anil Parab: देशमुखांना गजाआड पाठवणाऱ्या ED अधिकाऱ्याकडून अनिल परबांच्या बंगल्याची झाडाझडती


मुंबई: शिवसेना नेते अनिल परब यांच्याविरोधात अखेर सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) कारवाईला सुरुवात केल आहे. ईडी अधिकाऱ्यांच्या पथकाने गुरुवारी सकाळी अनिल परब यांच्याशी संबंधित सात ठिकाणांवर छापे टाकले आहेत. यामध्ये अनिल परब (Anil Parab) यांचे शासकीय निवासस्थान आणि वांद्रे येथील घराचाही समावेश असल्याचे सांगितले जाते. ईडी (ED) अधिकाऱ्यांचे पथक सीआरपीएफ जवानांचा फौजफाटा घेऊन शिवालय या बंगल्यावर सकाळीच दाखल झाले. अनिल परब सध्या याचठिकाणी उपस्थित असल्याचे कळते. (ED action agaisnt Shivsena leader Anil Parab)

अनिल परब यांच्या शिवालय या शासकीय निवासस्थानी दाखल झालेल्या ईडी अधिकाऱ्यांच्या पथकात सहाय्यक संचालक तासीन सुलतान यांचाही समावेश आहे. तासीन सुलतान हेच अनिल देशमुख प्रकरणातील तपासाधिकारी होते. देशमुख यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात गजाआड पाठवण्यात तासीन सुलतान यांची महत्त्वाची भूमिका होती. त्यामुळे आता अनिल परब यांच्याविरोधात ईडी काय कारवाई करणार, हे पाहावे लागेल. सूत्रांच्या माहितीनुसार, तासीन सुलतान यांच्याकडून अनिल परब यांची चौकशी होऊ शकते. या चौकशीनंतर अनिल परब यांना ईडी ताब्यात घेणार का, हे पाहावे लागेल.

विशेष म्हणजे ईडीने अनिल परब यांच्याविरोधात आर्थिक गैरव्यवहाराचा (Money Laundering) गुन्हाही दाखल केला आहे. कोणतेही ठोस पुरावे हाती लागल्याशिवाय ईडीकडून संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला जात नाही. त्यामुळे अनिल परब यांच्याविरोधात ईडीच्या हाती ठोस पुरावे लागले असावेत, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. आता ईडीच्या छापेमारीत आणखी कोणते नवे पुरावे समोर येतात का, हे पाहावे लागेल. त्यामुळे ईडीकडून अनिल परब यांना अटक केली जाणार का, हे पाहावे लागेल. आज सकाळी ईडीने अनिल परब यांचे शासकीय निवास्थान शिवालय आणि वांद्रे येथील खासगी निवासस्थानासह त्यांच्याशी संबंधित सात ठिकाणांवर छापा मारला आहे. मुंबई, पुणे आणि दापोली परिसरात हे छापे टाकण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.

ईडीच्या कारवाईनंतर किरीट सोमय्यांचा निशाणा

या कारवाईच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी तातडीने प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.निल देशमुख, नवाब मलिक आणि आता अनिल परब यांचा नंबर लागला आहे. परब यांनी शेकडो कोटींचा घोटाळा केलाय. परब यांचे सर्व काळे कारनामे बाहेर येतील. आता त्यांनी बॅग भरायला घ्यावी, असा सूचक इशारा किरीट सोमय्या यांनी दिला.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

en_USEnglish