आरक्षण संपवणे हाच भाजप आणि ‘आरएसएस’चा अजेंडा, नाना पटोलेंचा आरोप

आरक्षण संपवणे हाच भाजप आणि ‘आरएसएस’चा अजेंडा, नाना पटोलेंचा आरोप

[ad_1]

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी भाजपने मंत्रालयावर काढलेला मोर्चा म्हणजे केवळ नौटंकी आहे. आरक्षण संपवणे हेच भाजप व त्यांची मातृसंस्था ‘आरएसएस’चा अजेंडा आहे. ओबीसींना आरक्षण मिळावे असे भाजप नेत्यांना वाटत असेल तर त्यांनी पंतप्रधान कार्यालयावर मोर्चा काढावा, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

पटोले म्हणाले की, मोर्चादरम्यान भाजप नेत्यांनी केलेली विधाने अत्यंत हास्यास्पद व बालीश होती. सत्तेच्या लालसेने पछाडलेल्या चंद्रकांत पाटील यांनी लोकांना ‘मसणात’ पाठवण्याची भाषा केली. ही मग्रुरी असून भाजपचे लोकच अशी भाषा वापरू शकतात. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे सरकार राज्यात असतानाच ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आणण्याची सुरुवात झाली आणि त्याला केंद्रातील भाजप सरकारने साथ दिली हे उघड सत्य आहे. त्यामुळे भाजपला ओबीसींच्या आरक्षणावर बोलण्याचा काहीही अधिकार नाही.

‘ओबीसींच्या राजकीय आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नयेत हीच काँग्रेस पक्षाची भूमिका आहे आणि त्यासाठी महाविकास आघाडी सरकारही प्रयत्नशील आहे. विधानसभेचा अध्यक्ष असताना मी स्वत: जातीनिहाय जनगणना करावी असा ठराव मांडून तो संमत करून घेतला. जातीनिहाय जनगणना झाली तर असे वाद निर्माणच होणार नाहीत; परंतु केंद्रातील भाजप सरकार त्यावर निर्णय घेत नाही. ओबीसी आरक्षणाच्या आजच्या परिस्थितीस भाजपच जबाबदार आहे. धनगर समाजाला पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत आरक्षण देण्याचे आश्वासन देणारा व नंतर पाच वर्षे त्यांना झुलवत ठेवणारा पक्षही भाजपच आहे’, असेही पटोले म्हणाले.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *