Anil Parab : सकाळीच अनिल परबांच्या घरावर ईडीची टक…टक; ‘या’ ठिकाणी छापासत्र सुरू

Anil Parab : सकाळीच अनिल परबांच्या घरावर ईडीची टक…टक; ‘या’ ठिकाणी छापासत्र सुरू


Anil Parab:  शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या निवासस्थानासह त्यांच्याशी संबंधित असलेल्या ठिकाणांवर व्यक्तींवर ईडीने छापेमारी सुरू केली आहे. ईडीने आतापर्यंत सात ठिकाणी छापेमारी केली आहे. ईडीने केलेल्या कारवाईमुळे अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. 

आज सकाळी ईडीने अनिल परब यांचे शासकीय निवास्थान ‘अजिंक्यतारा’ आणि वांद्रेतील खासगी निवासस्थानासह त्यांच्याशी संबंधित सात ठिकाणांवर छापा मारला आहे. आज सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास ईडीने छापा मारला. या  कारवाईमध्ये ईडीचे वरिष्ठ अधिकारीदेखील सहभागी आहेत. अनिल देशमुख यांच्या तपासातील मुख्य तपास अधिकारी ईडीचे  सह-संचालक तासीन सुलतानदेखील अनिल परब यांचे शासकीय निवासस्थान ‘अजिंक्यतारा’ येथे चौकशीसाठी दाखल झाले आहेत. 

>> ईडीकडून या ठिकाणी छापा

1. अजिंक्यतारा, शासकीय निवासस्थान, मंत्रालयाजवळ

2. मोनार्क इमारत, खासगी निवास्थान, वांद्रे पूर्व

3.  अनिल परबांशी संबंधित चेंबूरच्या एका बांधकाम व्यावसायिकाच्या घरी इडी छापे.

4. दापोलीतील साई रिसॉर्ट

5. दापोलीतील जमीन अनिल परबांना विकणारे विभास साठे यांच्या कोथरुड येथील घरी

6. दापोलीतील जमिन अनिल परबांना विकणारे विभास साठे यांचे कोथरुडमधील कार्यालय

ईडीच्या छाप्यांमागे सचिन वाझे कनेक्शन?

पोलीस बदल्यांप्रकरणी आरोपी सचिन वाझेंच्या जबाबामध्ये अनिल परबा यांचे नाव समोर आले होते. वाझेच्या जबाबानंतर ईडीकडून तपास सुरू झाला. त्याच अनुषंगाने ईडीने आज छापा मारला. दरम्यान, निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याने सीबीआय विशेष कोर्टाकडे माफीचा साक्षीदार होण्यासाठी अर्ज दाखल केला आहे.  

अनिल परबांचे साई रिसॉर्ट प्रकरण आहे काय?

पर्यावरण मंत्रालय भारत सरकार यांनी 31 जानेवारी 2022 रोजी दापोली रत्नागिरी येथील साई रिसॉर्ट एन एक्स व सी कोच हे अनधिकृत असून तोडण्याचे आदेश दिले होते. 90  दिवसांमध्ये रिसॉर्ट मालक किंवा प्रशासनाने हे दोन्ही रिसॉर्ट तोडायचे होते. मात्र, 90 दिवस पूर्ण झाले असून अजूनही रिसॉर्ट पाडण्यात आले नाही. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

en_USEnglish