संजय राऊतांची आठ वर्षांपासून अनैतिक कामं, चंद्रकांत पाटलांचा टोला

संजय राऊतांची आठ वर्षांपासून अनैतिक कामं, चंद्रकांत पाटलांचा टोला

[ad_1]

मुंबई : केंद्रीय तपास यंत्रणांनी केलेली आतापर्यंतची जवळपास सर्व कारवाई कोर्टात टिकली. पण कोर्टावरही त्यांचा अविश्वास आहे. अनिल देशमुख आणि नवाब मलिकांच्या प्रकरणंही कोर्टाने नाकारले नाहीत. आरोपपत्राबातही सहमती दर्शवली. आणि खटला पुढे चावण्याची परवागनी दिली. मग म्हणतात दरवेळी कोर्ट यांच्याच बाजूने कसा निर्णय देतं, अशी शंका उपस्थित केली जाते. संजय राऊत यांचं ते कामच आहे, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला. केंद्र सरकार सूडाने कारवाई करत आहे. आणि आम्ही अनिल परब यांच्या पाठीशी उभे आहोत, असं शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली.

महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकार आल्यापासून म्हणजे २०१४ पासून ते आताच्या महाविका आघाडी सरकारपर्यंत, महाराष्ट्रात यंत्रणेबद्दल संशय निर्माण करणं आणि यंत्रणा मोडणं आणि जे जे अनैतिक आहे, म्हणजे शिवसेना-भाजपचं जे सख्य होतं. त्यात काडी टाकणं. बाळासाहेब ठाकरेंपासून शिवसेना-भाजपचा ज्यांच्याबद्दल द्वेष होता, त्या शरद पवारांशी दोस्ती करणं, हे जे जे अनैतिक आहे, ते करण्याचा आणि मांडण्याचा प्रयत्न संजय राऊत यांनी गेल्या आठ वर्षांपासून केला आहे. त्याच प्रयत्नातून काहीही झालं की म्हणायचं केंद्रावर आरोप करायचे, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

भाजप नेत्यांवर ईडीची कारवाई का होत नाही? यावरही पाटील यांनी उत्तर दिलं. अनिल देशमुखांवर कारवाई होईना, त्यावेळी कोर्टात याचिका करण्यात आली. कोर्टाने सीबीआय चौकशीचा निर्णय दिला. ही चौकशी केंद्राने किंवा देवेंद्र फडणवीसांनी नाही लावली. यामुळे त्यांनाही कोर्टाचे दरवाजे उघडे आहेत. आपल्या म्हणण्याला कुठलाही आधार नाही. हे त्यांना माहिती आहे. यामुळे ते कोर्टात कसे जाणार?, असं पाटील म्हणाले.

‘काहीजण अमक्यावर-तमक्याबद्दल सूतोवाच करतात, नंतर केंद्रीय तपास यंत्रणांची कारवाई होते’

सदानंद सुळेंच्या टीकेला उत्तर

सुप्रियाताईच नाही तर कुठल्याही सामान्य महिलेला आदर देण्याचा आपला स्वभाव आहे. भाजपच्या विधानसभेत जेवढ्या महिला आमदार आहेत, तेवढ्या कोणत्याही पक्षाच्या नाहीत. ग्रामीण भागात काही म्हणी आहेत. पोरालाही आई म्हणते, मसणात जा तिकडे. मसणात जाण्याचा आईच्या बोलण्याचा अर्थ पोराला स्मशानभूमित पाठवण्याचा नसतो. जमत नसेल तर सोडू दे हे, असंही ग्रामीण भागात बोललं जातं. यामुळे सुप्रिया ताईंबद्दल आपल्या मनात कुठलाही अनादर करण्याचा विचार नाही. जेव्हा-जेव्हा आम्ही भेटतो तेव्हा खूपच आदराने आम्ही एकमेकांची चौकशी करतो. काहींनी पराचा कावळा केला. पण सुप्रियाताईंनी माझ्या वक्तव्यावर सकारात्मक प्रतिकिया दिली. हे बोलण्याचा दादांना अधिकार आहे, असं सुप्रियाताई म्हणाल्या. पण विद्या चव्हाण म्हणणार हे स्त्रीद्वेष्टे आहेत. याचा काय संबंध आहे, असं स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील यांनी दिलं.

परबांसोबत शिवसेनेचे यशवंत जाधव अडचणीत; करोना काळात दुबईतील कंपनीत जमा केले ५ कोटी

स्वयंपाकाचा विषय काढून टाकू. जर तुम्हाला हे ट्रिपल टेस्ट कळत नसेल, ओबीसी राजकीय आरक्षण मिळत नसेल तर घरी जा, असं आपल्या म्हणण्याचा विषय होता. त्यामुळे सदानंदजी तुमच्या पत्नीचा किंवा कोणाचाच अनादर करण्याचा माझा स्वभाव नाही, अशी सारवासारव चंद्रकांत पाटील यांनी केली. ज्या ओबीसी समाजाच्या प्रेमापोटी मी हा संताप व्यक्त केला. त्या ओबीसी समजाला आनंद झाला. दादांनी सात्विक संताप व्यक्ते केला. जमत नसेल तर घरी जा. त्यामुळे आपल्या वक्तव्याचं एवढं अवडंबर गाजवण्याचं कारण नाही, असं चंद्राकत पाटील म्हणाले.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *