आनंद माझा पोटात माईना रे माईना! परबांवरील कारवाईनंतर गुणरत्न सदावर्ते जोशात

[ad_1]
या कारवाईमुळे कोणाला किती राजकीय फायदा होईल ते माहिती नाही, पण अनिल परब यांच्यावरील कारवाईमुळे अॅडव्होटकेट गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांच्या आनंदाला मात्र पारावार राहिलेला नाही. अनिल परब यांच्यावरील कारवाईनंतर गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबईत ‘मटा ऑनलाईन’शी संवाद साधला. यावेळी गुणरत्न सदावर्ते यांना आनंद ओसंडून वाहत होता. परिवहन मंत्री असलेल्या अनिल परब यांनी एसटी संपकऱ्यांविषयी घेतलेल्या भूमिकेवरून सदावर्ते यांनी त्यांच्यावर पुन्हा एकदा चढवला. परिवहनमंत्री असलेल्या अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाकडे संवेदनशीलतेने बघितले नाही. आज त्यांच्यावर कारवाई झाली. हे त्यांच्या कर्माचे फळ आहे. अनिल परब यांना पैशांची चटक लागली आहे. त्यामुळे त्यांनी आर्थिक गैरव्यवहार केला. आम्ही या गोष्टी पूर्वी सांगितल्या होत्या. पण आमचे म्हणणे तेव्हा ऐकले नाही, असे सदावर्ते यांनी म्हटले.
यानंतर सदावर्ते यांनी ‘जैसी करनी, वैसी भरनी’ असे गाणे म्हणत नाचायलाच सुरुवात केली. आम्ही तरी ‘भारत माता की जय’ म्हणत तुरुंगात गेलो. पण आज काही लोक दरवाजाच्या फटीतून दिसत आहेत, असा टोला गुणरत्न सदावर्ते यांनी लगावला. अनिल परब यांच्यावर ईडीची कारवाई झाल्यानंतर एसटीच्या कर्मचाऱ्यांनी मिठाई वाटून आनंद साजरा केला.
अनिल परबांच्या सीएच्या निवासस्थानी ईडीची धाड
अनिल परब यांच्या सीएच्या घरी छापेमारी करण्यात आली आहे. त्या चौकशीतून ईडीला नेमकं काय अपेक्षित आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये. याआधी अनिल परब यांच्या सीएच्या घरी आयकर विभागाने छापेमारी केली होती. अनेक ठिकाणी आयकर विभागाने छापेमारी केली होती. अनिल परब यांचे सीए आधी आयकर विभागाच्या रडारवर होते. आता ईडीकडून झाडाझडती सुरु झाली आहे.
[ad_2]
Source link