अभिनेत्रीच्या हत्येनंतर अवघ्या २४ तासांत पोलिसांकडून चोख प्रत्युत्तर; दोन्ही दहशतवादी ठार

अभिनेत्रीच्या हत्येनंतर अवघ्या २४ तासांत पोलिसांकडून चोख प्रत्युत्तर; दोन्ही दहशतवादी ठार

[ad_1]

जम्मू काश्मीर : बडगाम जिल्ह्यातील चादूरा येथे दोन दहशतवाद्यांनी टीव्ही अभिनेत्रीची गोळ्या घालून हत्या केल्याने खळबळ उडाली होती. या घटनेनंतर पोलिसांनी २४ तासांच्या आतच अवंतीपुरा येथे झालेल्या चकमकीत दोनही दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. शाहीद मुश्ताक आणि फरहान हबीब अशी ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची नावे असून ते ‘लष्कर-ए-तोयबा’ या संघटनेशी संबंधित असल्याचं सांगितलं जात आहे.

अमरीन भट या अभिनेत्रीला दहशतवाद्यांनी घरात घुसून गोळ्या घातल्या होत्या. भट यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यावेळी दहशतवाद्यांच्या गोळीबारात अमरीन भट यांचा १० वर्षांचा पुतण्याही जखमी झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी वेगवान हालचाली करत हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांच्या खात्मासाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली होती.

Accident: पालघरमध्ये मद्यधुंद चालकामुळे एसटी बस २० फूट दरीत कोसळली, १५ प्रवाशी गंभीर जखमी

गुरुवारी रात्री अवंतीपुरा येथे पोलिसांनी दहशतवाद्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या चकमकीत दोनही दहशवादी ठार झाले आहेत. मागील तीन दिवसांत ‘जैश-ए-मोहम्मद’चे तीन आणि ‘लष्कर ए तोयबा’चे सात अशा एकूण १० दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आल्याची माहिती पोलीस महानिरीक्षकांनी दिली आहे.

अभिनेत्रीची का केली हत्या?

अमरीन भट्ट या अभिनेत्री आणि गायिका होत्या. सोशल मीडियावर त्या आपल्या गायनाचे विविध व्हिडिओ शेअर करत असत. अमरीन यांच्यावर काही कट्टरतावाद्यांनी अभिनय सोडण्यासाठी दबाव आणला होता, असंही सांगण्यात येत आहे. या दबावानंतरही अमरीन यांनी अभिनयापासून दूर होण्यास नकार दिल्यानेच त्यांची हत्या करण्यात आल्याची माहिती आहे.

कॉलेजपासून तरुणीला ओढत नेलं आणि चाकूने भोसकलं; शहर हादरवणारा घटनेचा व्हिडिओ

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *