आजच्या सामन्यात सर्वांच्या नजरा जोस  बटलरवर, ‘हा’ विक्रम करण्याची संधी 

आजच्या सामन्यात सर्वांच्या नजरा जोस  बटलरवर, ‘हा’ विक्रम करण्याची संधी 
आजच्या सामन्यात सर्वांच्या नजरा जोस  बटलरवर, ‘हा’ विक्रम करण्याची संधी 


IPL 2022 Qualifier 2: आयपीएल 2022 (IPL 2022) च्या क्वालिफायर 2 मध्ये राजस्थान रॉयल्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुशी होणार आहे. या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामध्ये पुन्हा एकदा सर्वांच्या नजरा राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर जोस बटलरवर ( jos buttler) असणार आहेत. मागच्या सामन्यात 89 धावांची खेळी करणाऱ्या बटलरकडून चाहत्यांना पुन्हा एकदा चांगल्या खेळीची अपेक्षा असणार आहे. त्याचबरोबर बटलरला या सामन्यात इतिहास रचण्याची संधी देखील आहे.

बटलर हा विक्रम करु शकतो

पुढच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा सलामीवर फलंदाज जोस बटलरला विक्रम करण्याची संधी आहे. जर बटलरने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध 82 धावा केल्या तर या मोसमात तो 800 धावा पूर्ण करेल. अशाप्रकारे, जर त्याने हा पराक्रम केला तर एका मोसमात 800 हून अधिक धावा करणारा तो तिसरा फलंदाज ठरणार आहे. यापूर्वी विराट कोहली आणि डेव्हिड वॉर्नर या दोघांनी एका मोसमात 800 पेक्षा अधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे. कोहलीने आयपीएलच्या एका मोसमात 973 धावा केल्या होत्या. तर डेव्हिड वॉर्नरने 848 धावा केल्या होत्या. त्यामुळे बटलरला विक्रम करण्याची संधी मिळणार आहे.

राजस्थानसमोर मोठे आव्हान

दरम्यान, राजस्थानला आजच्या सामन्यात विजय मिळवायचा आहे. संघाचा मदार ही सलामीचे फलंदाज  जोस बटलर आणि कर्णधार संजू सॅमसन यांच्यावर खूप अवलंबून  असणार आहे. या दोघांनी गुजरातविरुद्धच्या मागील सामन्यात चांगल्या धावा केल्या होत्या. बटलर हा सामना जिंकण्यासाठी आपल्या अनुभवाचा उपयोग करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. राजस्थान संघ व्यवस्थापन देवदत्त पडिक्कल, यशस्वी जैस्वाल, शिमरॉन हेटमायर आणि रियान पराग यांच्या फलंदाजीतील योगदानाचा शोध घेत आहे. ज्यांनी धावा काढण्यासाठी संघर्ष केला आहे. राजस्थानच्या बॉलिंग लाइनअपमध्ये, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल, ओबेड मॅकॉय, प्रसिद्ध कृष्णा यांच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे. ते आरसीबीविरुद्ध कसे पुनरागमन करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, आज यंदाच्या आयपीएल स्पर्धेतील अंतिम सामना खेळणारा दुसरा संघ आपल्या सर्वांसमोर येणार आहे. याआधी पहिल्या क्वॉलीफायर सामन्यात गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सला मात देत अंतिम सामन्यात जागा मिळवली आहे. ज्यानंतर आता आज राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरुचा संघ मैदानात दुसरा क्लॉलीफायर सामना उतरणार आहे.

महत्वाच्या बातम्या:Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

en_USEnglish
%d bloggers like this: