अंतिम सामन्यात एन्ट्रीसाठी राजस्थान विरुद्ध बंगळुरुमध्ये रंगणार सामना,वाचा आतापर्यंतची आकडेवारी

अंतिम सामन्यात एन्ट्रीसाठी राजस्थान विरुद्ध बंगळुरुमध्ये रंगणार सामना,वाचा आतापर्यंतची आकडेवारी
अंतिम सामन्यात एन्ट्रीसाठी राजस्थान विरुद्ध बंगळुरुमध्ये रंगणार सामना,वाचा आतापर्यंतची आकडेवारी


RCB vs PBKS : यंदाच्या आयपीएलमधील (IPL 2022) आजचा क्वॉलीफायर दोन हा सामना राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरु (RR vs RCB) या दोन्ही संघात पार पडत आहे. आज विजय मिळवणारा संघ थेट अंतिम सामन्यात एन्ट्री मिळवणार आहे. दरम्यान याआधीच क्वॉलीफायर एक मध्ये गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सला मात देत आधीच अंतिम सामन्यात एन्ट्री केली असल्याने आजचा विजेता संघ अंतिम मॅचमध्ये गुजरातशी भिडणार आहे. दरम्यान आजचा सामना सायंकाळच्या सुमारास होणार असल्याने दुसऱ्यांदा गोलंदाजी करणाऱ्या संघाला दवाची अडचण येऊ शकते, त्यामुळे नाणेफेक जिंकणारा सामना प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्याची दाट शक्यता आहे.

राजस्थान विरुद्ध बंगळुरु Head to Head

आयपीएलमध्ये आजवर राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरु हे संघ तब्बल 27 वेळा एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता बंगळुरुचं पारडं काहीसं जड राहिलं आहे. त्यांनी 13 सामन्यात विजय मिळवला आहे. तर राजस्थानना 11 सामने जिंकण्यात यश मिळवलं आहे. याशिवाय तीन सामने अनिर्णीत देखील सुटले आहेत. यंदाच्या गुणतालिकेचा विचार करता दोन्ही संघानी चांगली कामगिरी केली असल्याने आज एक चुरशीचा सामना क्रिकेट रसिकांना पाहायला मिळू शकतो.

आजच्या सामन्यात अशी असू शकते संभाव्य अंतिम 11  

राजस्थान – संजू सॅमसन (कर्णधार, विकेटकिपर), जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडीक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रवीचंद्रन आश्विन, ओबेद मॅकॉय, ट्रेन्ट बोल्ट, प्रसिध कृष्णा, युझवेंद्र चहल

बंगळुरु – रजत पाटीदार, फाफ डु प्लेसीस (कर्णधार), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), माहिपाल लोमरोर, शाहबाज अहमद, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, जोश हेझलवुड, मोहम्मद सिराज

हे देखील वाचा-Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

en_USEnglish
%d bloggers like this: