Mumbai Indians : पुढील हंगामात पोलार्डला रिलीज करेल मुंबई इंडियन्स? आकाश चोप्रा म्हणाला…

Mumbai Indians : पुढील हंगामात पोलार्डला रिलीज करेल मुंबई इंडियन्स? आकाश चोप्रा म्हणाला…
Mumbai Indians : पुढील हंगामात पोलार्डला रिलीज करेल मुंबई इंडियन्स? आकाश चोप्रा म्हणाला…


Kieron Pollard in Mumbai Indians : इंडियन प्रिमियर लीगमधील (IPL) सर्वात यशस्वी संघ असणाऱ्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने आयपीएल 2022 (IPL 2022) स्पर्धेत मात्र अत्यंत खराब कामगिरी केली. 14 पैकी 10 सामने गमावत ते दहाव्या स्थानीच होते ज्यामुळे स्पर्धेतून सर्वात आधी त्यांचच आव्हान संपुष्टात आलं होतं. दरम्यान संघातील स्टार खेळाडूंचा खराब फॉर्म यामागील सर्वात मोठं कारण होतं. या खराब फॉर्ममधील खेळाडूंमध्ये संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्ड (Keiron Pollard) याचा देखील समावेश आहे. त्यामुळे पुढील हंगामात पोलार्ड संघात असण्यावर अनेक प्रश्नचिन्ह आहेत. दरम्यान याबाबतच भारताचा माजी खेळाडू आकाश चोप्राने आपलं मत दिलं आहे.

‘पोलार्डला रिटेन नाही करणार मुंबई इंडियन्स’

माजी भारतीय क्रिकेटर आकाश चोप्राच्या मते, मुंबई इंडियन्स (MI) पुढील हंगामासाठी  कायरन पोलार्डला रिटेन करणार नाही. चोप्रा त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना म्हणाला, ‘पुढच्या हंगामात पोलार्डला मुंबई रिटेन करणार नाही. तसंच फिरकीपटू  मुरुगन आश्विन आणि टायमल मिल्सलाही मुंबई रिलीज करेल. जयदेव उनाडकटला रिटेन करण्याबाबत आता काहीही सांगता येणार नाही. 

अर्जून तेंडुलकरला अखेरपर्यंत संधी नाहीच

आयपीएलच्या पंधराव्या हंगामात मुंबई इंडियन्सचं आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आलं.  मुंबई इंडियन्सला तब्बल 10 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान पोलार्ड, रोहित सारखे स्टार खेळाडू फेल झाले, तर मुंबईने अनेक खेळाडूंना प्लेईंग 11 मध्ये संधी दिली.. पण अर्जुन तेंडुलकरला स्थान दिले नाही. यावरुन चाहत्यांनी मुंबईला प्रश्नही केले.. अखेरच्या काही सामन्याआधी प्रत्येकवेळा अर्जुनच्या पदार्पणाची चर्चा व्हायची. मात्र मुंबईचं स्पर्धेतील आव्हान संपलं पण अर्जुन बाकावरच राहिला. दोन वर्षांपासून अर्जुन तेंडूकलर बाकावरच आहे. 

हे देखील वाचा-Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

en_USEnglish
%d bloggers like this: