‘कधीही हाक मारावी, छत्रपती त्याच्या सेवेसाठी हजर राहणार’; संभाजीराजे कोणाला म्हणाले

‘कधीही हाक मारावी, छत्रपती त्याच्या सेवेसाठी हजर राहणार’; संभाजीराजे कोणाला म्हणाले


मुंबई:संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत राजेंनी ही मोठी घोषणा केली. निवडणुकीत घोडेबाजार होऊ नये म्हणून निवडणूक लढवणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पण ही माघार नव्हे तर माझा स्वाभिमान असल्याचे ते म्हणाले.

राज्यसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून सहा उमेदवार निवडूण जाणार आहेत. यापैकी सहाव्या जागेसाठी संभाजीराजे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहणार असल्याची घोषणा संभाजीराजेंनी पुण्यात केली होती. त्यानंतर शिवसेनेकडून त्यांना पक्षप्रवेश करण्याची ऑफर आली होती. यासंदर्भात आज संभाजीराजेंनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका जाहीर केली. कोणत्याही पक्षात प्रवेश न करण्यावर ठाम असल्याने मी शिवसेनेची ऑफर नाकारल्याचे सांगत संभाजीराजे यांनी ज्या आमदारांनी मला पाठिंबा दिला आणि माझ्या अर्जावर सही केली, त्यांचे आभार मानले. या सर्व आमदारांच्या पाठिशी मी आयुष्यभर उभे राहणार असल्याचे संभाजीराजेंनी पत्रकार परिषदेत सांगितले.

वाचा- मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीत काय घडलं? संभाजीराजेंनी सांगितली Inside Story

ज्या आमदारांनी माझ्या अर्जावर सही केली. मी आयुष्यभर त्यांच्या पाठीशी राहणार. त्यांनी कधीही हाक मारावी, छत्रपती त्याच्या सेवेसाठी हजर राहणार, अशा शब्दात संभाजीराजे यांनी आमदारांना पाठिंबा दिला.

वाचा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मला दिलेला शब्द फिरवला; संभाजीराजे छत्रपतींचा आरोप

संभाजीराजेंच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

महाराष्ट्राच्या जनतेने खूप प्रेम दिले, जनतेते मनापासून आभार
पुढचा प्रवास किती खडतर आहे याची कल्पना होती
राजवाडा सोडून महाराष्ट्रासाठी काम करतोय
चर्चा करण्यासाठी माझ्याकडे मुख्यमंत्र्यांनी दोन खासदार पाठवले
मुख्यमंत्र्यांना स्पष्टपणे सांगितले शिवसेनेत प्रवेश करू शकत नाही
मुख्यमंत्र्यांनी फोन केला- भेटण्यासाठी बोलवले
छत्रपती आमच्या सोबत हवेत- मुख्यमंत्री म्हणाले
मी मुख्यमंत्र्यांना महाविकास आघाडीचा अपक्ष उमेदवार अशी ऑफर दिली
संजय पवार माझा लाडका कार्यकर्ता
स्वराज्य बांधण्यासाठी मी सज्ज झालोय
घोडेबाजारासाठी मी उमेदवारी नाही
घोडेबाजार होऊ नये म्हणून मी निवडणूक लढवणार नाही, पण ही माघार नव्हे
ज्या आमदारांनी माझ्या अर्जावर सही केली, त्याच्यासोबत आयुष्यभर राहणार
उद्यापासून महाराष्ट्र दौरा करणार
माघार नाही, हा माझा स्वाभिमान आहे
मुख्यमंत्री आणि संभाजीराजे यांच्यात नेमक काय झाले
राजकीय पक्षाचा द्वेष नाही
सर्व अपक्ष आमदारांवर दबाव होता, त्यांनी फोन करून पाठिंबा दिलाSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

en_USEnglish
%d bloggers like this: