आज बंगळुरु विरुद्ध राजस्थानचा ‘हा’ फलंदाज करणार करु शकतो अधिक धावा, सेहवागनं कारणही सांगितलं

आज बंगळुरु विरुद्ध राजस्थानचा ‘हा’ फलंदाज करणार करु शकतो अधिक धावा, सेहवागनं कारणही सांगितलं
आज बंगळुरु विरुद्ध राजस्थानचा ‘हा’ फलंदाज करणार करु शकतो अधिक धावा, सेहवागनं कारणही सांगितलं


IPL 2022 Qualifier 2 : आज सायंकाळी 7.30 वाजता आयपीएल 2022 स्पर्धेतील क्वॉलीफायर-2 हा सामना गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सुरु होईल. राजस्थान रॉयल्स (RR) आणि रॉयल चँलेंजर्स बंगळुरु (RCB) यांच्यातील या सामन्याकडे सर्वांचेच लक्ष लागले असून अनेक प्रतिक्रिया देखील येत आहेत. भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) याने देखील आज राजस्थानचा सलामीवीर देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal) अधिक धावा करु शकतो अशी भविष्यवाणी केली आहे. त्याने यामागील कारणही सांगितलं आहे. 

वीरेन्द्र सेहवागने यामागील कारण देताना सांगितलं आहे की, ”या हंगामाच्या आधी पडिक्कल बंगळुरु संघातून खेळत होता. त्यामुळे त्याला संघातील महत्त्वाच्या गोलंदाजांची टेक्निक माहित आहे. हर्षल पटेल, मोहम्मद सिराज यांना नेटमध्ये त्याने बरच खेळलं असल्याने आजही तो चांगली कामगिरी करु शकतो.” पडिक्कलने मागील हंगामात बंगळुरुकडून 5 अर्धशतकं ठोकत 474 रन केले होते. तो इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर देखील ठरला होता. यंदा राजस्थान संघाने त्याला 7.75 कोटी खर्च करुन संघात घेतलं आहे.

हेड टू हेड राजस्थान विरुद्ध बंगळुरु

आयपीएलमध्ये आजवर राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरु हे संघ तब्बल 27 वेळा एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता बंगळुरुचं पारडं काहीसं जड राहिलं आहे. त्यांनी 13 सामन्यात विजय मिळवला आहे. तर राजस्थानना 11 सामने जिंकण्यात यश मिळवलं आहे. याशिवाय तीन सामने अनिर्णीत देखील सुटले आहेत. यंदाच्या गुणतालिकेचा विचार करता दोन्ही संघानी चांगली कामगिरी केली असल्याने आज एक चुरशीचा सामना क्रिकेट रसिकांना पाहायला मिळू शकतो.

आजच्या सामन्यात अशी असू शकते संभाव्य अंतिम 11  

राजस्थान – संजू सॅमसन (कर्णधार, विकेटकिपर), जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडीक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रवीचंद्रन आश्विन, ओबेद मॅकॉय, ट्रेन्ट बोल्ट, प्रसिध कृष्णा, युझवेंद्र चहल

बंगळुरु – रजत पाटीदार, फाफ डु प्लेसीस (कर्णधार), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), माहिपाल लोमरोर, शाहबाज अहमद, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, जोश हेझलवुड, मोहम्मद सिराज

हे देखील वाचा-Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

en_USEnglish
%d bloggers like this: