ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानसह सहा जणांना क्लिनचीट; 14 आरोपींविरोधात चार्जशीट दाखल


Cruise Ship Drugs Case : आर्यन खानला (Aryan Khan) अटक करण्यात आलेल्या कॉर्डिलिया क्रझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी एनसीबीचं आरोपपत्र कोर्टात दाखल करण्यात आलं. या प्रकरणामधील 14 आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. आर्यन खानसह सहा जणांना या प्रकरणात क्लिनचीट मिळाली आहे. सबळ पुराव्यांअभावी सहा जणांविरोधात कोणतेही आरोप नाहीत. केवळ 14 जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. एनसीबीचे डीडीजी संजय सिंह यांनी याबाबत माहिती दिली आहे.
याप्रकरणी तपास करत असलेल्या एसआयटीला कोर्टानं मार्च अखेरीस दिलेली 60 दिवसांची मुदतवाढ दिली होती. याप्रकरणी आर्यनसह 20 जणांना अटक झाली होती. आता या प्रकरणात आर्यनला दिलासा मिळाला आहे कारण त्याच्या विरोधात आरोपपत्र दाखल झालेलं नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण 10 खंडाचे आरोपपत्र न्यायालयाच्या रजिस्ट्रीमध्ये सबमिट करण्यात आलेलं आहे. 6000 पानांचे आरोपपत्र असल्याचे सूत्रांनी सांगितले.
Cruise drug bust case | All the accused persons were found in possession of Narcotics except Aryan and Mohak, reads a statement of Sanjay Kumar Singh, DDG (Operations), NCB
— ANI (@ANI) May 27, 2022
आर्यन खान, अरबाज मर्चेंट, मुनमुन धमेचा, विक्रांत छोकर, मोहक जैसवाल,इशमित सिंह, गोमती चोप्रा, नूपुर सतीजा, अब्दुल कादर शेख, श्रेयश नायर, मनीष राजगरिया, अविन साहू, समीर सिंघल, मानव सिंघल, भास्कर अरोरा, गोपाल जी आनंद, अचीत कुमार, चीनेडु इग्वे, शिवराज हरिजन, ओकोरो उजेओमा या सर्वांना या प्रकरणात अटक करण्यात आली होती.