कान्समध्ये दीपिकानं रणवीरला मांडीवर बसवलं आणि म्हणाली…, Video Viral

कान्समध्ये दीपिकानं रणवीरला मांडीवर बसवलं आणि म्हणाली…, Video Viral


मुंबई : कान्स फिल्म फेस्टिवलमधले नजारे, चमकधमक अगदी डोळे दिपवून टाकणारं होतं. एकेकाचे पोशाख, अदाकारी पाहण्यासारख्या होत्या. हे व्हिडिओज व्हायरल झालेच. पण काही आतले व्हिडिओही आता बाहेर येत आहेत. त्यातलाच एक दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगचा. दोघंही खूप धमाल करताना दिसत आहेत. या व्हिडिओत दीपिका तिच्या मेकअप रूममध्ये आहे.

सोनाली कुलकर्णीनं सासरी केला पहिला गोड पदार्थ, लाजत घेतला उखाणा

इतक्यात रणवीर तिथे येतो. आणि थेट दीपिकाच्या मांडीवर बसतो. त्यावर दीपिका हसून म्हणते, ही माझी ट्राॅफी आहे. दोघंही खूप खूश दिसत आहेत. सोशल मीडियावर या व्हिडिओला फॅन्सची पसंती मिळाली आहे. अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

दीपिकानं आतापर्यंत कान्समधले अनेक सुंदर फोटो शेअर केले. काही दिवसांपूर्वी तिनं पोस्ट केलेल्या फोटोत ती पांढरा शर्ट आणि हाॅट पिंक कलरचा स्कर्ट घातलाय. आणि ती एकदम स्टनिंग ब्युटी दिसतेय. तिच्याबरोबर रणवीरही आहे.

कन्याकुमारी तेवढंच तुमचं आहे जेवढं काश्मीर माझं आहे- कमल हासन

यावेळी दीपिका पादुकोण कान्समध्ये स्पेशल ज्युरी म्हणून गेली होती. तिचे तिथले जलवे लोकप्रिय झाले. करण जोहरच्या बर्थडे पार्टीत दीपिका पादुकोण उपस्थित राहू शकली नाही. रणवीर सिंग एकटाच आला होता. करण जोहरची बर्थडे पार्टी म्हणजे बाॅलिवूडचं रियुनियनच होतं.

करण जोहरच्या बर्थडे पार्टीत रणवीर हा एकदम विनोदी अवतारात आला होता. तो करण जोहरसोबत डीजेवर नाचत होता. त्यानं डीजे स्टेजवर डफली वाजवली. त्यावर करण जोहरनं डान्स केला. सोशल मीडियावर करण जोहरच्या बर्थडे पार्टीचं असंख्य व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

करण जोहरच्या बर्थ डेला गर्लफ्रेंड सबासह पोहोचला हृतिकSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

en_USEnglish