४० वर्षांपासून राहात होते, अतिक्रमणावर रेल्वेचे बुलडोझर; नागरिकांना अश्रू अनावर

४० वर्षांपासून राहात होते, अतिक्रमणावर रेल्वेचे बुलडोझर; नागरिकांना अश्रू अनावर


पुरंदर, पुणे : पुरंदर तालुक्यातील नीरा नदीच्या रेल्वे पुलाशेजारी असणाऱ्या अतिक्रमणावर रेल्वेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली. गेल्या चाळीस वर्षांहून अधिक काळ राहणाऱ्या गोर-गरिबांची पक्की घरे आणि झोपड्या कारवाईत पत्त्यांच्या घरांप्रमाणे पाडण्यात आली.

बहुतांश लोकांनी आधीच आपली घरे मोकळी करुन या भागातून काढता पाय घेतला होता. तरीही रिकामी घरे ही रेल्वेने बुलडोझर फिरवत भुईसपाट केली. आपल्या मोकळ्या घरांवर बुलडोझर फिरताना पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले.

नीरा येथील पुणे-मिरज रेल्वे लाइन शेजारील प्रभाग १ मधील गोपाळ वस्तीतील सुमारे ४५ कुटुंबांना रेल्वे प्रशासनाच्यावतीने मंगळवार २४ मे पूर्वी घरे खाली करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. बुधवारी २५ मे रोजी रेल्वेने अतिक्रमणविरोधात कडक कारवाई केली.

दोन जेसीबीच्या सहायाने सर्व परिसरतील कच्चे-पक्के बांधकाम जमिनदोस्त करण्यात आले. साताऱ्याचे सिनियर सेक्शन इंजिनीयर ओस्पाल सिंग यादव यांच्या नेतृत्वात २१ कर्मचारी अतिक्रमण कारवाइत सहभागी होते. घोरपडीचे आरपीएफ सिनीयर इन्सस्पेक्टर अजीत माने यांच्या मार्गदर्शनाखाली आरपीएफचे १६ पोलीस कर्मचारी, जेजुरी पोलीस स्टेशनचे २ व नीरा जी.आर.पी.चे २ कर्मचाऱ्यांनी पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

रेल्वेकडून अतिक्रमण विरोधात कडक कारवाई होणार याची कल्पना आली होती. त्यामुळे २० घरकुलधारक व २५ झोपडीधारकांनी वेळीच सावध पवित्रा घेत आपली घरे मोकळी करुन, घरसामान सुरक्षित ठिकाणी पोहच केले. या ४५ कुटुंबातील सुमारे ३५० लोकांना आता बेघर होण्याची वेळ आली आहे.

मागील दोन दिवसांत गोपाळ वस्तीतील हे लोक नीरेच्या विविध प्रभागात भाडोत्री घर किंवा झोपडी उभी करण्यासाठी जागा शोधत होते. काहींनी ग्रामपंचायतीच्या राखीव जागेत, काहींना ठेकेदारांनी आपल्या सोईसाठी आपल्या खासगी जागेत जागा उपलब्ध करुन दिली. तर काहींनी पालखी तळाच्या मागील जागेत आपले बस्तान बसवले.

वास्तविक बेघर झालेल्या लोकांच्या घरांचा प्रश्न जिल्हाधिकारी, प्रांत, तहसीलदार यांनी मार्गी लावणे क्रमप्राप्त होते. आधी पुनर्वसन मंग अतिक्रमण कारवाई असे होणे गरजेचे असताना. स्थानिक गावपुढारी आपली पोळी भाजण्याच्या प्रयत्नात होते. यात गोरगरिबांची पोळी करपवून बसल्याची भावना सामजिक कार्यकर्ते व रिपाइंचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष अमोल साबळे यांनी बोलून दाखवली.

अतिक्रमण विभागाकडून आंबेविक्रेत्याचा छळ?

‘अतिक्रमण काढते वेळी लोकांनी कोणतीही गडबड गोंधळ घातला नाही. लोकांनी स्वतःहून सहकार्य केले. स्थानिक लोकप्रतिनिधींनी ही संयम बाळगत रेल्वेच्या कारवाईला सहकार्यच केले. त्यामुळे कारवाई शांततेत झाली’, अशी माहिती रेल्वेचे सेक्शन इंजिनिअर ओसपाल सिंह यादव यांनी दिली.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

en_USEnglish
%d bloggers like this: