IPL झाल्यानंतर धोनी निवडणुकीच्या ड्यूटीवर? पाहा काय आहे प्रकरण

IPL झाल्यानंतर धोनी निवडणुकीच्या ड्यूटीवर? पाहा काय आहे प्रकरण


रांची: आयपीएल २०२२मध्ये चार वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी अतिशय खराब झाली. प्लेऑफमध्ये पोहोचण्यास अपयशी ठरलेल्या चेन्नईला गुणतक्त्यात शेवटून दुसऱ्या म्हणजेच नवव्या स्थानावर समाधान मानावे लागले. रविंद्र जडेजा आणि महेंद्र सिंह धोनी अशा दोघांच्या चेन्नईचे नेतृत्व केले होते. १४ पैकी त्यांना फक्त ४ सामन्यात विजय मिळवता आला.

स्पर्धेतील आव्हान लवकर संपुष्टात आल्याने धोनी लवकर घरी गेला. या दरम्यान सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यात धोनी सारखा दिसणारा एक व्यक्ती ग्राम पंचायत निवडणुकीत काम करतोय.

वाचा- ‘विराट’ विक्रम मोडणे राजस्थानच्या ‘रॉयल’ साठी कठीण, पण दिग्गजांना मागे टाकण्याची संधी

सध्या झारखंडमध्ये पंचायत निवडणुका सुरू आहेत. यासाठी मतदान केंद्रावर ड्यूटी करणाऱ्या एका व्यक्तीचा फोटो व्हायरल झालाय. ही व्यक्ती भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीसारखा दिसतोय. ज्या व्यक्तीचा फोटो व्हायरल होत आहे त्याचे नाव विवेक कुमार असून ते सीसीएलमध्ये सहाय्यक प्रबंधक म्हणून काम करत आहेत.

वाचा- IPL 2022: चहल-हसरंगामध्ये ‘काटे की टक्कर’, कोण ठरेल क्वालिफायर २ चा ‘किंग’

विवेक कुमार हे रांचीमधील ग्राम पंचायत निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात एका मदतान केंद्रावर काम करत होते. धोनी सारख्या दिसणाऱ्या विवेकला पाहिल्यानंतर अनेक जण त्यांच्या सोबत फोटो काढतात. त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर देखील व्हायरल होत आहेत.

वाचा- बेंगळुरूचे दोन धुरंधर सॅमसनसाठी ठरू शकतात खलनायक, राजस्थानच्या फायनलचे स्वप्न धुळीस मिळवतील

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणारा महेंद्र सिंह धोनी सध्या फक्त आयपीएलमध्ये खेळतो. आयपीएलच्या १५व्या हंगामाच्या आधी त्याने चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व सोडले होते. पण हंगामाच्या मध्येच पुन्हा धोनीकडे कर्णधारपद देण्यात आले. रविंद्र जडेजाच्या नेतृत्वाखाली संघाला चांगली कामगिरी करता न आल्याने हा निर्णय घेण्यात आला होता.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

en_USEnglish