पवारांनंतर विकासाचं व्हिजन असलेला राष्ट्रीय नेता म्हणजे गडकरी: संजय राऊत

हेही वाचा –भाजपने तिसरी जागा लढवली तरी फरक पडत नाही, विजय आमचाच होणार, राऊतांनी ललकारलं
‘देशातील विकासाचे ९० टक्के काम हे नितीन गडकरी यांचे’
“सध्या देशात जो विकास दिसतोय आणि या विकासाची चित्रे दाखवली जात आहेत. त्यातले ९० टक्के काम हे नितीन गडकरी यांचे आहे. रस्ते पूल आणि आपल्या सीमेपर्यंतची दळणवळणाची साधने निर्माण झाली, त्याचे श्रेय गडकरी यांना द्यावे लागेल. विकासाची दृष्टी असलेला आणि विकासाआड राजकारण न आणणारा राष्ट्रीय स्तरावर शरद पवार यांच्यानंतर जर कोणी नेता असेल तर तो म्हणजे नितीन गडकरी”, असं म्हणत संजय राऊतांनी नितीन गडकरींवर स्तुती सुमनं उधळली.
हेही वाचा –‘खंजीराची भाषा करु नका, बोलताना जरा सांभाळून बोला’, मराठा संघटनांवर राऊत भडकले
“ते महाराष्ट्राचे आहेत म्हणून मला त्यांचा सदैव अभिमान आहे. देशाच्या विकासामध्ये महाराष्ट्राचे योगदान काय, हे नितीन गडकरी यांनी केलेल्या गेल्या सात वर्षांतील कामांमधून आपल्याला दिसून येईल. नितीन गडकरी हे जरी भारतीय जनता पक्षाचे नेते असले, तरी देशातला प्रत्येक पक्ष आणि प्रत्येक नेता हा त्यांचा चाहता आहे. गडकरींच्या टीकाटिपणीमध्ये कधी विखार नसतो. ते स्वभावाने फटकळ आहेत. पण मनाने निर्मळ आहेत. मी त्यांना माझ्यातर्फे आणि माझ्या पक्षातर्फे उदंड आणि निरोगी आयुष्य चिंतितो”, असं म्हणत त्यांनी नितीन गडकरींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
राज्यसभा निवडणूक लढवणार नाही, पण ही माघार नाही | छत्रपती संभाजीराजे