कोंडीच्या धबधब्यावर पुन्हा नव्याने अवतरला डरकाळी फोडणारा वाघ….

Kalatarang Alibag
कलाकृती —
आर्टिस्ट – महेंद्र गावंड (कलाशिक्षक) बेलोशी अलिबाग
सहकलाकार – प्रज्वल वादळ,वेदांत वादळ,अनिरुद्ध भोपीं,
अनिकेत गावंड.निखिल पिंगळा,योगेश शिद.
.. बेलोशी गावापासून काही अंतरावर सागवाडी येथील डोंगराळ निसर्गरम्य भागात खळखळत वाहणारा कोंडीचा धबधबा हे एक पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे.
.

२०२१ मध्ये तेथील भल्या मोठ्या आकाराच्या दगडावर डरकाळी फोडणाऱ्या वाघाची कलाकृती साकारली होती .

ही कलाकृती संपूर्ण महाराष्ट्रात तसेच सर्वत्र चर्चेचा विषय बनली न्यूज चॅनल ,वर्तमान ,व्हॉट्सॲप ,फेसबुक,मध्ये खूप प्रसिद्धी मिळाली होती ..

गेल्यावर्षी अतिवृष्टीमुळे या कलेचे कलर्स उडालेले लक्षात आले परंतु त्यावेळी खानाव गावचे सरपंच जितेंद्र दादा गोंधळी आणि बेलोशी गावचे माझे मित्र चंद्रकांत निरकर (निसर्गप्रेमी)यांनी त्यावेळी सहकार्य करून आम्हाला प्रोत्साहन दिले.

या निसर्गप्रेमी मित्रांचे मनापासून धन्यवाद.
या वर्षी पर्यटकांना आकर्षित करणारी विविध कलाकृती माझ्या संकल्पनेतून साकारण्यात आली आहेत .
यावेळी कोंडीच्या धबधब्यावर नक्कीच नवीनकलाकृती पाहायला मिळणार आहेत.

आपल्या आजूबाजूचे सळसळत वाहणारे धबधबे आपण सर्वांनी आकर्षित करून त्यांची जोपासना करून निसर्ग सौंदर्य वाढविण्यात मदत करावी.

आपणास कलाकृती आवडल्यास नक्कीच कमेंट करा आणि शेअर लाइक नक्की करा.

आणि आम्हाला सहकार्य सुद्धा नक्कीच करा जेणेकरून निसर्ग सौंदर्य वाढविण्यात आम्हाला तुमचा हातभार लागेल.
(कलाशिक्षक – महेंद्र गावंड . बेलोशी – अलिबाग)
9209818001