‘रिया चक्रवर्तीनेच सुशांतसाठी खरेदी केले ड्रग्ज’, अभिनेत्रीविरोधात NCB ने कोर्टात दाखल केले आरोप

‘रिया चक्रवर्तीनेच सुशांतसाठी खरेदी केले ड्रग्ज’, अभिनेत्रीविरोधात NCB ने कोर्टात दाखल केले आरोपमुंबई: बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput Drug Case) याच्या मृत्यूनंतर समोर आलेल्या ड्रग प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून चौकशी केली जात आहे. याप्रकरणी NCB ने रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक आणि अन्य काही जणांना मुख्य आरोपी ठरवले आहे. आता याप्रकरणी एनसबीने अभिनेत्री रिया, तिचा भाऊ शौविक आणि अन्य आरोपींविरोधात विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. एनसीबीने रिया आणि इतरांवर सुशांतसिंह राजपूतसाठी ड्रग्ज खरेदी केल्याचा आरोप केला आहे.

हे वाचा-एवढं घडूनही ‘कुल’ आहेत हे… अभिनेत्याकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक

न्यायालयाने अद्याप आरोप निश्चित केलेले नाहीत
विशेष सरकारी वकील अतुल सरपंदे यांनी आरोपपत्रातील सर्व आरोपींवर आरोप निश्चित केल्याचे सांगितले. आरोपपत्र दाखल करताना त्यांनी म्हटले आहे की, रिया चक्रवर्ती आणि शौविक यांनी ड्रग्सचा वापर केला आणि सुशांतसिंहसाठी त्यांनी ते खरेदीही केले. न्यायालयाकडून सर्व आरोपींवर आरोप निश्चित केले जाणार होते परंतु काही आरोपींनी दोषमुक्तीसाठी अर्ज दाखल केल्याने तसे होऊ शकले नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

१२ जुलैला होणार सुनावणी
न्यायालयाकडून जोपर्यंत दोषमुक्त अर्जावर निर्णय होत नाही तोपर्यंत आरोप निश्चित केले जाऊ शकत नाहीत. बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती न्यायालयात उपस्थित होते. विशेष न्यायाधीश व्हीजी रघुवंशी यासंदर्भात १२ जुलै रोजी सुनावणी करणार आहेत.

हे वाचा-नाना पाटेकर यांची वेबविश्वात एन्ट्री, या सीरिजमध्ये दिसणार राजकारण्याच्या भूमिकेत

महिनाभर जेलमध्ये होती रिया
सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर समोर आलेल्या ड्रग प्रकरणात रिया चक्रवर्तीला सप्टेंबर २०२० मध्ये अटक करण्यात आली होती. जवळपास महिनाभर ती जेलमध्ये होती, त्यानंतर रियाला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला होता. अभिनेता सुशांतसिंह राजपूत १४ जून २०२० रोजी त्याच्या मुंबईतल राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआय चौकशी करत होती, पण ही एजन्सी देखील कोणत्याही निर्णयापर्यंत पोहोचली नाही आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

en_USEnglish