एअरपोर्टवरचा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी केलं करण जोहरच्या मुलांचं कौतुक

एअरपोर्टवरचा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी केलं  करण जोहरच्या मुलांचं कौतुक


मुंबई: बॉलिवूड सेलिब्रिटीं कधी कुठे जातात, कुठून परत येतात यावर बारीक लक्ष ठेवून असणारे फिल्मी फोटोग्राफर एक छबी मिळावी म्हणून पायपीट करत असतात. कलाकारांनाही अशी प्रसिध्दी हवीच असते. पण आता फक्त सेलिब्रिटी कलाकारच नव्हे तर त्यांच्या मुलांचेही चाहते आहेत. स्टारकिड आणि त्यांच्या विषयी समोर येणारे फोटो, व्हिडिओ पाहण्यासाठी चाहत्यांच्याही उड्या पडतात हे काही नवं नाही. आता या पंक्तीत निर्माता दिग्दर्शक करण जोहरच्या जुळा मुलांनीही कमाल केली आहे. यश आणि रूही या करणच्या मुलांनी असं काही केलं सध्या त्यांचा हाच व्हिडिओ व्हायरल होतोय.

करण काही दिवसांपूर्वी आई आणि दोन मुलांसह लंडनला सुट्टी घालवण्यासाठी गेला होता. लंडनमध्ये धमाल करून नुकताच करण मुंबईत परत आला. मुंबई विमानतळावर करण आणि त्याच्या दोन्ही मुलांना फिल्मी फोटोग्राफर्सनी गराडा घातला. यावेळी यश आणि रूही यांनी करणचा हात धरला होता. करणचे फोटो काढण्यासाठी जेव्हा फोटोग्राफर त्याच्याजवळ आले तेव्हा चक्क यश आणि रूही यांनी फोटोग्राफर्सना नमस्कार केला. करणच्या मुलांकडून मिळालेलं हे प्रेम बघून फोटोग्राफर चांगलेच भारावले.

फिल्मी फोटोग्राफर्सनी यश आणि रूही या चिमुकल्यांकडून नमस्कार करतानाचा व्हिडिओ शूट केला आहे. हा व्हिडियो सोशलमीडियावर पसंती मिळवत आहे. यश आणि रूही यांच्या विमानतळावरील बाळलीलाही फोटोग्राफर्सनी टिपल्या आहेत. विमानतळाबाहेर गाडीत बसून घरी जातानाही यश आणि रूही यांनी फोटोग्राफर्सना हात हलवून बाय बाय केलं. स्टार किड असूनही नमस्कार कऱणाऱ्या या चिमुकल्याचं बॉलिवूडमधूनही कौतुक होत आहे.

करणचा एअरपोर्ट लुकही त्याच्या चाहत्यांना आवडला आहे. काळ्या रंगाचा शर्ट पँट, डेनिम जॅकेट आणि पांढरे स्नीकर्स घालून करण खूपच छान दिसत होता. गॉगलची आवड असलेल्या करणचा लाल गॉगलही भाव खाऊन गेला. रूही काळा टीशर्ट आणि गुलाबी जॅकेटमध्ये सुंदर दिसत होती. यशने ब्लॅक ट्रॅक सूट आणि स्नीकर्स घातले होते. यावेळी करणच्या आई व्हिलचेअरवर बसून येत होत्या.

करण जोहर सध्या त्याच्या जुग जुग जियो या सिनेमाच्या यशाचा आनंद घेत आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. ७ जुलैपासून करणचा कॉफी विद करण या शोचा सातवा सीझन येणार आहे. या शोचं प्रमोशनही जोरात सुरू आहे. रॉकी और रानी की प्रेम कहानी या सिनेमाच्या शूटिंगही लगबग सुरू आहे. या सगळ्यातून मुलांसोबत एन्जॉय करण्यासाठी करण लंडनला गेला होता.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

en_USEnglish